Marathi News> मनोरंजन
Advertisement

दिव्यांका-विवेकच्या नात्यात दुरावा ; हे आहे कारण

टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचे सध्या करिअर जोरावर आहे. 

दिव्यांका-विवेकच्या नात्यात दुरावा ; हे आहे कारण

मुंबई : टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचे सध्या करिअर जोरावर आहे. पण सेटवर काही दिवसांपासून नव्या गोष्टी कानी पडत आहेत. दिव्यांकाच्या प्रेमाला ग्रहण लागले आहे. याचे कारण आहे पती विवकेच्या काही सवयी.
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया हे टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय जोडी. त्यांच्या लग्नानंतरही त्यांचे नाते तितकेच फ्रेश होते. यांच्याकडून पाहून प्रत्येकजण रब ने बना दी जोडी असेच म्हणत असे. विवेकबद्दल कोणी काही वाईट बोलल्यास दिव्यांकाने लगेच त्याला सडतोड उत्तर देत असे. दिव्यांका आणि विवेकच्या फोटोज वरुन जेव्हा त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले तेव्हाही तिने जबरदस्त उत्तर दिले. 

नेमके काय बिनसले?

पण आता नात्यात पूर्वीचा फ्रेशनेस उरला नाही. दिव्यांकाला मिळणाऱ्या चाहत्यांच्या अटेंशनमुळे विवेक काहीसा नाराज आहे. दिव्यांकापुढे आपली लोकप्रियता कमी होत असल्याचे त्याला वाटत आहे. दोघांच्याही जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक आता दिव्यांकाशी नीट वागत नाही. दोघांच्या नात्यात कटूता निर्माण झाली आहे. पण आपल्या कुटुंबाच्या आणि संसाराचा विचार करुन दिव्यांकाने या चर्चेवर मौन धारण केले आहे.

दिव्यांका शूटिंग दरम्यान विवेक आणि तिच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देत असते. तर दुसरीकडे विवेक दिव्यांकासोबत पब्लिक इव्हेंटमध्ये जाण्यास नकार देत आहे. विवेककडे काही खास काम नसल्यामुळे तो सध्या तणावात आहे आणि त्याचमुळे असे वागत असल्याचे बोलले जात आहे.

विवेकच्या कामासाठी दिव्यांकाचे प्रयत्न

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काम मिळावे म्हणून दिव्यांकाने टीव्ही प्रोग्रॉम निर्मात्यांशी विवेकची भेट करुन दिली. पण काही खास निष्पन्न झाले नाही. अलिकडे विवेक हॉरर शो 'कयामत की रात' मध्ये दिसला. पण त्यात त्याची प्रमुख भूमिका नाही आहे. याशिवाय एकता कपूरचा शो 'कवच' मध्येही त्याने काम केले. पण त्या शो ला फारसे यश न मिळाल्याने तो बंद पडला.

यावर दिव्यांका म्हणते...

यावर दिव्यांका म्हणाली की, विवेकसोबतच्या नात्यात काही अडचणी आहेत. पण त्या लवकरच सोडवल्या जातील. दोन वर्षांपूर्वी ८ जुलैला दोघेही विवाहबद्ध झाले होते. 

Read More