Marathi News> मनोरंजन
Advertisement

दिशा पाटणी वाईटरित्या Troll; म्हणाले स्वस्तातली लिसा हेडन

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू सिनेमा 'लोफर'मधून केली.

दिशा पाटणी वाईटरित्या Troll; म्हणाले स्वस्तातली लिसा हेडन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू सिनेमा 'लोफर'मधून केली होती. ती बऱ्याच सिनेमात काम करत असते. नुकतीच तिने एक विलेन रिटर्न्स सिनेमाचं शुटिंग पुर्ण केलं. ज्यामध्ये रॅपअप पार्टी ठेवली होती. आणि दिशादेखील याच पार्टीला पोहचली होती. या पार्टीत बरेच मोठे सेलिब्रिटी सहभागी होते. 

या पार्टीत दिशाने ब्लॅक ऑफ शोल्डर कॉर्सेट ड्रेस घातला  होता. यासोबतच तिने आपला लूक सिंपल ठेवण्यासाठी केस मोकळे ठेवत अतिशय हलका मेकअप केला होता. पण चाहत्यांनी तिचा व्हिडिओ पाहिला. मात्र तिचा तो लूक पाहून त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

दिशा नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते. पण यावेळी ती या पार्टीत स्पॉट झाली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर काहीसा बदलही दिसत होता. जे पाहून चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं की, 'तिच्या चेहऱ्याला काय झालं' , तर दुसऱ्याने 'प्लास्टिक सर्जरी' असं लिहिलं, तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं की, 'गालाचं फिल्टर का वापरलं?. याशिवाय एका यूजरने लिहिलं की, 'लिसा हेडनची स्वस्त कॉपी दिसते, याची काहीच गरज नव्हती'.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनवला गेला आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी या एक्शन ड्रामा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. इतकंच नाही तर दिशाचा 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट यावर्षी ८ जुलैला रिलीज होणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा भारताच्या पाकिस्तानवरील सर्वात धाडसी मोहिमेपासून प्रेरित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि दिशा पटानी आणि राशी खन्ना मुख्य भूमिकेत आहेत.

Read More