Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूडमध्ये दुसरी उर्फी जावेद! 'बार्बी डॉल की....' Revealing dress मुळे अभिनेत्री ट्रोल

एक उर्फी जावेद काय कमी होती, जी दुसरी आली...या अभिनेत्रीला म्हणतायत दुसरी उर्फी...अभिनेत्री  नव्या लूकमुळे ट्रोल

बॉलिवूडमध्ये दुसरी उर्फी जावेद! 'बार्बी डॉल की....' Revealing dress मुळे अभिनेत्री ट्रोल

मुंबई : दिशा पटानी तिचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतचं या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री एका मॉलमध्ये पोहोचली. यादरम्यान अभिनेत्री अशा लूकमध्ये दिसली की तिला पाहून सगळे दंग झाले. यावेळी दिशाने शॉर्ट आणि डीप नेक टॉप घातला होता. अभिनेत्रीच्या या लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिशा पटानीने तिची हेअरस्टाईल पण हटके केली होती. तिचा लूक पाहून तिला पहिल्या नजरेत ओळखणंही कठीण झालं होतं. तिने पिवळ्या रंगाचा टॉप घातला आहे जो खूप जास्त Revealing आहे. त्यामुळे तिची तुलना उर्फी जावेदशी केली जात आहे. 

उर्फी जावेद आपल्या अजब फॅशन स्टाईलमुळे ट्रोल होत असते. आता तसाच प्रकार दिशाने केल्याचं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. दिशा उर्फीच्या पावलावर पाऊल तर ठेवत नाही ना? असा प्रश्नही काही युजर्सना पडला आहे.

दिशाने बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी दोन बो घातले आहेत. आतापर्यंतच्या लूकमध्ये दिशाचा हा सगळ्यात वेगळा आणि हटके लूक आहे. ज्यामुळे सर्वात जास्त ट्रोल देखील झाली आहे. 

दिशाने पिवळ्या रंगाचा टॉप अंर्तवस्त्र न घालता परिधान केल्याचं दिसत आहे. डीपनेकमुळे तिचा हा लूक जास्तच बोल्ड असल्याने ती सध्या चर्चेत आली आहे. एक विलेन रिटर्न्स हा सिनेमा 29 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दिशासोबत जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जून कपूर लीड रोलमध्ये दिसणार आहेत. 

Read More