Marathi News> मनोरंजन
Advertisement

टायगर सोबत न जाता दिशा पटाणी कुणासोबत गेली डिनर डेटला?

दिशा तिच्या बॉयफ्रेंन्डसोबत डिनरडेटला गेली असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. यासाठी  मुंबईत हॉटेलबाहेर गर्दी पहायला मिळाली. 

टायगर सोबत न जाता दिशा पटाणी कुणासोबत गेली डिनर डेटला?

मुंबई : ग्लॅमरस बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी कायमच टायगरच्या आणि तिच्या अफेअर्सच्या चर्चांमुळे चर्चेत असते..मात्र यावेळी या दोघांमुळे चर्चा होत नाहीये तर चक्क दिशा टायगरच्या बहिणीमुळे चर्चेत आली आहे. दिशा पटानीने नुकतीच डिनर डेटसाठी प्रियकर टायगर श्रॉफ याच्यासह न जाता त्याची बहिण कृष्णासोबत स्पॉट झाली.

यावेळी  दिशा तिच्या बॉयफ्रेंन्डसोबत गेली असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. यासाठी  मुंबईत हॉटेलबाहेर गर्दी पहायला मिळाली. दिशा आणि कृष्णाचे हातातहात घालून चालतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. दिशा पटानी आणि कृष्णा श्रॉफ यादोघांची चांगली मैत्री आहे. रेस्टॉरंटमध्ये जाताना या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून चालत होत्या.

fallbacks

आपल्या डिनरडेटसाठी दिशाने क्रॉप टॉप आणि स्कर्टची निवड केली. तर टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने ब्लॅक टॉप ज्यामध्ये तिने डेनिम शॉर्ट्स आणि बूट्स परिधान केले होते. तिने कोविड १९  विरूद्ध खबरदारीचा उपाय म्हणून फेस मास्क लावला होता.या दोघी डिनरडेटवर पोहचल्या नंतर त्यांच्यापाठोपाठ तिथे टायगर श्रॉफदेखीस पोहचला मात्र..यावेळी दिशा कृष्णा आणि तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

fallbacks

दिशा लवकर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई' या सिनेमात दिसणार आहे. तसंच अभिनेता जॉन अब्राहमसोबत 'एक विलेन द रिटर्न्स' मध्ये ती झळकणार आहे. सध्या दिशा दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. दिशा आणि टायगरचा 'हिरोपंती २' हा चित्रपट ३ डिसेंबर २०२१मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसंच गणपत या सिनेमात देखील टायगर झळकणार आहे. बागी सिनेमाच्या यशानंतर टायगर बागी ४ यासिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे

Read More