Marathi News> मनोरंजन
Advertisement

Lockdown : दिशा आणि टायगर लिव्ह-इनमध्ये नाहीत, कृष्णा श्रॉफचं स्पष्टीकरण

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.   

Lockdown : दिशा आणि टायगर लिव्ह-इनमध्ये नाहीत, कृष्णा श्रॉफचं स्पष्टीकरण

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड कपल्स एकत्र राहत आहेत. घटस्पोट झाला असला तरी अभिनेता ऋतीक रोशन आणि सुझान खान त्यांच्या मुलांसोबत एकत्र राहत आहेत. त्यांच्याशिवाय आभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट, कृती खरबंदा आणि पुलकीत सम्राट देखील एकत्र वेळ घालवत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री दिशा पटनी अभिनेता टायगर श्रॉफच्या कुटुंबासोबत मुंबईत राहत असल्याच्या चर्चा चांगल्याच  रंगत आहेत. परंतु या सर्व चर्चांना टायगरची बहीण कृष्णा श्रॉफने पूर्णविराम दिला आहे. 

एका मुलाखती दरम्यान टायगर आणि दिशा एकत्र राहत नसल्याचा खुलासा कृष्णाने केला आहे. ती म्हणाली, दिशा आमच्यासोबत राहत नाही. ती आमच्या शेजारी राहते. पण काही सामान घेण्यासाठी आम्ही एकत्र येतो. त्यानंतर तिने टायगर आणि दिशाच्या नात्याबद्दल सांगितले. 

'गेल्या अनेक वर्षांपासून दिशा आणि टायगर एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दिशा फिटनेसबद्दल अत्यंत जागृत असते त्यामुळे त्यांची मैत्री फार घट्ट आहे. टायगरला ऐकटं राहणं आवडत आणि दिशा अत्यंत मन मिळावू असल्यामुळे टायगरला तिच्यासोबत वेळ व्यतीत करायला आवडतो. ' असं म्हणत तिने दिशा आणि भाऊ टायगरच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 

दरम्यान टायगरने देखील त्याच्या आणि दिशाच्या नात्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही, पण एका मुलाखती दरम्यान मला दिशासोबत राहायला आवडतं असं सांगितलं होतं. तो म्हणाला होता, 'आमच्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे. मला दिशाचा सहवास फार आवडतो. आमची पसंत देखील जवळपास सारखी आहे' कलाविश्वात माझे फार मित्र नाहीत असं देखील तो म्हणाला होता. 

Read More