Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनय सोडून 'हे' काम करणार होते जेठालाल...मात्र नशिबात काहीतरी वेगळंच होतं

मुंबईः छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका 2008 सालापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल हे पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं आहे.

अभिनय सोडून 'हे' काम करणार होते जेठालाल...मात्र नशिबात काहीतरी वेगळंच होतं

मुंबईः छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका 2008 सालापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत एकापेक्षा एक सरस कलाकार आहेत. प्रत्येक कलाकार त्याच्या खास भूमिकेसाठी ओळखला जातो.यामध्ये 'जेठालाल'च्या भूमिकेत दिलीप जोशींपासून ते 'बापूजी'च्या भूमिकेत अमित भट्ट आणि 'बबिता जी'च्या भूमिकेत मुनमुन दत्ता यांचा समावेश आहे.

fallbacks
या 13 वर्षात या मालिकेने अनेक चढ-उतार पाहिले मात्र आजही ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.आज आम्ही तुम्हाला या टीव्ही सीरियलमध्ये 'जेठालाल'ची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशींबद्दल सांगणार आहोत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' करण्यापूर्वी जेठालाल यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. 

fallbacks

मात्र एक काळ असा होता की, दिलीप जोशी ग्लॅमर जगताला अलविदा करण्याच्या तयारीत होते. दिलीप जोशी यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ऑफर न झाल्यामुळे हे घडलं होतं. ही मालिका ऑफर होण्यापूर्वी दिलीप दुसर्‍या मालिकेत काम करत होते, पण ती मालिका बंद झाली. अशा परिस्थितीत दिलीप जोशी वर्षभर बेरोजगार होते आणि त्यांनी ग्लॅमर जगापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता.

fallbacks

मात्र, दरम्यान, 2008 मध्ये दिलीप जोशींना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका ऑफर झाली आणि त्यानंतर त्यांचा काळ बदलला. दिलीप जोशी आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत.

fallbacks

या मालिकेने त्यांना प्रचंड प्रसिद्धी दिली. आज त्यांच्याकडे 40 कोटींची संपत्ती असून ते प्रत्येक एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये घेतात..

Read More