Marathi News> मनोरंजन
Advertisement

Vedio: 'दिलबर' गर्ल नोराचे अनोखे नृत्य प्रदर्शन

मोरोक्कनची सुंदरा अभिनेत्री नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भलताचं व्हायरल होताना दिसत आहे.

Vedio: 'दिलबर' गर्ल नोराचे अनोखे नृत्य प्रदर्शन

मुंबई : मोरोक्कनची सुंदरा अभिनेत्री नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसत आहे. 'दिलबर' गाण्यातील तिच्या नृत्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. आता तिने 'सत्यमेव जयते' सिनेमातील एका गाण्यावर चांगलाच ताल धरला. बॉक्स ऑफिसरवर सुध्दा या सिनेमाने चांगलीच मजल मारली होती. सोशल मीडियावर नोराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या नृत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

नोरा सध्या  'भारत' सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यग्र आहे. सलमान खान, कटरीना कैफ, तब्बू, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर सिनेमात झळकणार आहेत. भारत सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. सिनेमाची निर्मिती अतुल अग्निहोत्री यांची आहे. बहुप्रतिक्षीत 
'भारत' सिनेमा 5 जून रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. 

त्याचप्रमाणे जॉन अब्राहम स्टारर सिनेमा 'बाटला हाउस' मध्ये नोराची वर्णी लागणार आहे.  'सत्यमेव जयते' सिनेमानंतर जॉन-नोरा दुसऱ्यांदा एकत्र झळकणार आहेत.

Read More