Marathi News> मनोरंजन
Advertisement

CID मधल्या अभिनेत्रीसोबत दयाचं अफेअर

दया कुछ तो गडबड है किंवा दया तोड दो दरवाजा अशी वाक्य लोकप्रिय होणारी मालिका CID

CID मधल्या अभिनेत्रीसोबत दयाचं अफेअर

मुंबई : दया कुछ तो गडबड है किंवा दया तोड दो दरवाजा अशी वाक्य लोकप्रिय होणारी मालिका CID

CID मधील दया म्हणजे दयानंद शेट्टी हा अभिनेता याच दोन वाक्यांमुळे सर्वाधिक लोकप्रिय झाला. सीआयडी या मालिकेने नुकतीच 20 वर्षेपूर्ण केली आहे. या मालिकेतील कलाकार यांचं प्रत्येकाशी नातं असलं तरीही दोन कलाकारांच खास नातं आहे. या मालिकेतील अभिनेत्री मोना आंबेगांवकर हिचं दयासोबत अफेअर सुरू असल्याची चर्चा होती. मोना आणि दयाने एका मुलीला देखील जन्म दिला आहे. मोना आता सिंगल मदर म्हणून या मुलीला सांभाळत आहे. 

20 वर्ष चाललेल्या या मालिकेला मोनाने 4 वर्षातच राम राम ठोकला आहे. डिसेंबर २००५ मध्ये तिने मुलीला जन्म दिला होता. मोनाचे हे मूल कोणाचे आहे यावर तिने मीडियाशी बोलणे नेहमीच टाळले आहे. मोनाचे हे मूल दयाचे असल्याचे म्हटले जाते. दयाचे लग्न स्मिता शेट्टीशी झाले असून त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. पण स्मिताशी लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी दयाच्या आयुष्यात मोना आली होती. मोना आणि दयाच्या मुलीविषयी मोनाच्या इंडस्ट्रीमधील जवळच्या सगळ्या मित्रांना माहीत आहे.

पण दयाने याविषयी मौन राखणेच पसंत केले आहे. मोना ही सिंगल मदर असल्याने मुलीचा सांभाळ करणे तिच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सोपे नाहीये. पण तरीही ती मुलीला प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करते. ती तिच्या मुलीबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह असून तिच्या खाजगी आयुष्याबद्दल ती न बोलणेच पसंत करते.

Read More