Marathi News> मनोरंजन
Advertisement

'शाहरूख बेटे...' धर्मेंद्र यांनी 'जवान'निमित्त शाहरूखचे 'या' तीन शब्दात केले कौतुक

Dharmendra on Shah Rukh Khan:  शाहरूख खानचा जवान हा चित्रपट उद्याच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी शाहरूख खानच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा हा चित्रपट आता कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी शाहरूखचे कौतुक केले आहे. 

'शाहरूख बेटे...' धर्मेंद्र यांनी 'जवान'निमित्त शाहरूखचे 'या' तीन शब्दात केले कौतुक

Dharmendra on Shah Rukh Khan: शाहरूख खानचा जवान हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. अगदी उद्यावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शाहरूखच्या चाहत्यांना या चित्रपटाची विशेष उत्सुकता लागून राहिली आहे. नयनतारा आणि शाहरूख खानची केमेस्ट्री यावेळी या चित्रपटातून आपल्या समोर येईल. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया यावेळी शाहरूखला बॉलिवूडमधील मान्यवर हे शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा आहे. यावेळी धर्मेंद्र यांनीही देखील शाहरूखला त्याच्या जवान या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धर्मेंद्र हे ट्विटरवर खूप जास्त सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी त्यांनी आपला नातू करण देओलच्या लग्नात हजेरी लावली होती. तेव्हाच त्यांनी ईशा देओलसाठी एक खास अशी इमोशनल पोस्टही शेअर केली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.

आता त्यांनी सुपरस्टार अभिनेता शाहरूख खानसाठी लिहिलही पोस्ट ही चांगलीच चर्चेत आहे. धर्मेंद्र हे कायमच नव्या होतकरू कलाकार तसेच आजच्या सुपरस्टारचे कौतुक करताना दिसतात. त्यामुळे त्यांचेही सोशल मीडियावर कौतुक होताना दिसते. शाहरूखसाठी त्यांनी हे खास शब्द शेअर केले आहेत. जे वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आपले वडील जसे आपल्या मुलाला सांगतात त्याप्रमाणे चार कौतुकाचे शब्द धर्मेंद्र यांनी आपल्या लाडक्या शाहरूखसाठी उच्चारले आहेत. त्यातून शाहरूखही धर्मेंद्र यांचा आदर करतो आणि सोबतच त्यांच्याबद्दल भरभरून बोलतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की धर्मेंद्र यांनी शाहरूखसाठी असं काय लिहिलं आहे. 

हेही वाचा : इवल्याश्या चेरी टॉमेटोमध्ये आहेत 'हे' औषधी गुण; पिझ्झा, पास्तामध्ये बिनधास्त वापरा

यावेळी धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवरून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ते म्हणतात की, 'शाहरूख बेटे, तुला खूप खूप शुभेच्छा जवानसाठी'. यावेळी शाहरूखला मिठीत घेतानाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रत्यय येईलच की शाहरूखवर धर्मेंद्र हे किती प्रेम करतात ते. या पोस्टखालीही चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. धर्मेंद्र आणि शाहरूख यंचा हा एकत्र फोटो सोशल मीडियावरही तूफान व्हायरल होतो आहे. 

जवान या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे आता सर्वांचीच शिगेला गेलेली उत्सुकताही ही शेवटी संपली आहे. आता उद्या, 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. 

Read More