Marathi News> मनोरंजन
Advertisement

'धर्मवीर' चित्रपटाच्या निर्मात्याने खरेदी केले नवीन घर, नेमप्लेटवर लिहिलंय 'असं' नाव

त्यांनी सहकुटुंब गणेश जयंतीच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे. नुकतंच एका व्हिडीओद्वारे नव्या घराची झलकही दाखवली आहे.

'धर्मवीर' चित्रपटाच्या निर्मात्याने खरेदी केले नवीन घर, नेमप्लेटवर लिहिलंय 'असं' नाव

Mangesh Desai House Nameplate : मराठी चित्रपटांपैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणून  ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला ओळखले जाते. 13 मे 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. हा चित्रपट ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर आधारित होता. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. यानंतर आता लवकरच धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वीच या चित्रपटाचे अभिनेते-निर्माते मंगेश देसाई यांनी एक गुडन्यूज दिली आहे. 

मंगेश देसाई  हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच मंगेश देसाईंनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी नवीन घर खरेदी केल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. यासोबतच त्यांनी एका व्हिडीओद्वारे नव्या घराची झलकही दाखवली आहे. मंगेश देसाई यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते त्यांच्या घराची नेमप्लेट दाखवताना दिसत आहेत. 

मंगेश देसाईंच्या घरावर आकर्षक नेमप्लेट

मंगेश देसाई यांनी सहकुटुंब गणेश जयंतीच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे. त्यांच्या घरी अत्यंत थाटामाटात गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांच्या दारात फुलांची खास सजावटही करण्यात आली होती. मंगेश देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला खास पारंपरिक लूक केला होता. मंगेश देसाई यांनी त्यांच्या नव्या घराच्या दारावर आकर्षक नेमप्लेट लावली आहे. यावर घरातील सर्वांचीच नावे पाहायला मिळत आहेत. ‘मंगेश शलाका साहील देसाई’ असे यावर लिहिण्यात आले आहे. '

मंगेश देसाई यांनी ही गुडन्यूज देताना हटके कॅप्शन दिले आहे. "आज मी खूप आनंदी आहे. तुम्हीही माझ्यासाठी आनंदी आहात ना?" असे मंगेश देसाईंनी म्हटले आहे. मंगेश देसाई यांनी दिलेल्या गुडन्यूजनंतर अनेक कलाकारांनी त्यांचा शुभेच्छा दिल्या आहेत. मंगेश देसाई यांच्या या व्हिडीओवर विजू माने, निखिल राऊत, दिप्ती धोत्रे अशा अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. त्यांनी मंगेश देसाई यांना नवीन घराबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान मंगेश देसाई  हे सध्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यात भगव्या रंगाच्या पोस्टरवर ‘धर्मवीर २’ असे लिहिण्यात आले होते. त्यासोबतच ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…’ अशी टॅगलाईनही देण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे करत आहेत. तर मंगेश देसाई हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 

Read More