Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीर आणि वहिनीची 'ही' गोष्ट कॅमेऱ्याद कैद; Video Viral झाल्यानंतर...

दीर आणि वहिनीच्या 'त्या' Video मुळे सोशल मीडियावर धुमाकूळ   

दीर आणि वहिनीची 'ही' गोष्ट कॅमेऱ्याद कैद; Video Viral झाल्यानंतर...

मुंबई : दीर आणि वहिनीचं नातं प्रत्येकाला माहिती असतं. दीर वहिनीसाठी तिच्या छोट्या भावाप्रमाणे असतो. त्यामुळे सासरी एखाद्या मुलीसाठी दीर आधार असतो. दीर आणि वहिनीचं नातं सर्वात मजेदार असतं. या नात्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ. या दोघांच्या डान्सचा एक व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र दोघांनी भन्नाट गाण्यावर धरलेल्या ठेक्याची चर्चा रंगत आहे. व्हायरल झालेल्या या डान्स व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वहिनी तिच्या दीरासोबत घराच्या ड्रॉईंग रूममध्ये हरियाणवी गाण्यांवर जबरदस्त डान्स करत आहे. 

व्हिडिओमध्ये दीर देखील वहिनीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा डान्स व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही डान्स करायला तयार व्हाल. 

यूजर्स त्याच्या डान्सचं प्रचंड कौतुक करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 59 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडिया यूजर्सही या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, "तुझा परफॉर्मन्स जबरदस्त आहे." सध्या दोघांच्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

Read More