Marathi News> मनोरंजन
Advertisement

हा किसिंग सीन करताना सर्व काही विसरले दीपवीर

क्रू मेंबरने केला खुलासा 

हा किसिंग सीन करताना सर्व काही विसरले दीपवीर

मुंबई : रामलीला या सिनेमापासून दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह एकमेकांच्या जवळ आले. 2012 मध्ये आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरपूर पसंत केलं. 

याच सिनेमाच्या वेळी दोघांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली. या सिनेमातील एका क्रू सदस्याने खुलासा केला की, कसे हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. क्रू च्या म्हणण्यानुसार फिल्म सिटीमध्ये अंग लगा दे गाण्याचं शुटिंग सुरू होतं. यावेळी यांचा किसिंग सीन शुट केला होता. 

अनस्क्रिप्टे किसिंग सीनमध्ये या दोघांची केमिस्ट्री आणि इंटेसिटी अतिशय उत्तम होती. दिग्दर्शकाच्या कट बोलण्यानंतरही हे दोघं एकमेकांना किस करतच राहिले. तेव्हा सगळ्यांनाच माहित होतं की, हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. पण या सीनमुळे ते अगदी कन्फर्म झालं. 

सेटवर हे दोघं आपल्या नात्याबद्दल अतिशय मोकळे होते. एकमेकांना सेटवर बेबी अशी हाक मारत असतं. एवढंच काय तर एकत्र जेवत असतं आणि जेव्हा शुटिंग नसेल तेव्हा ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये एकत्र वेळ घालवायचे. 

Read More