Marathi News> मनोरंजन
Advertisement

सासु-सासऱ्यांसोबत पतीचा सिनेमा पाहायला पोहोचली दीपिका

सिंबा सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग

सासु-सासऱ्यांसोबत पतीचा सिनेमा पाहायला पोहोचली दीपिका

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या सिंबा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने रणवीर आणि साराचा सिंबा सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग मुंबईमध्ये ठेवण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी यासाठी हजेरी लावली. पण विशेष लक्ष होतं ते दीपिकावर... कारण दीपिका पादुकोण आपल्या सासू-सासऱ्यांसोबत पती रणवीर सिंहचा सिनेमा पाहायला पोहोचली होती.

fallbacks fallbacks

दुसरीकडे मुलीचा सिनेमा पाहण्यासाठी सारा अली खानची आई अमृता सिंह आणि भाई इब्राहिम अली खान देखील यावेळी उपस्थित होते. अमृता सिंह या ग्रे सलवार सूटमध्ये यावेळी दिसल्या.

fallbacks

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Simmba screening it’s a merry merry Christmas for sure ! A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

आशुतोष राणा हे देखील संपूर्ण स्टारकास्ट सोबत उपस्थित होते. अभिनेता मुरली शर्मा हे देखील या स्क्रिनिंगसाठी पोहोचले होते.

सिनेमाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील यावेळी उपस्थित होते.

अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील आपल्या पत्नीसोबत यावेळी पोहोचला होता.

सिंबा सिनेमाचा प्रोड्यूसर करण जोहर देखील यावेळी उपस्थित होता. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली हा सिनेमा बनला आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता आहे. सिंबा हा तेलगू सिनेमा टेंपरचा रिमेक आहे. या सिनेमात जूनियर एनटीआर लीड रोलमध्ये होता. सिंबामध्ये रणवीर सिंह एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. रणवीरसोबत सारा अली खान या मुख्य भूमिकेत आहे.

Read More