Marathi News> मनोरंजन
Advertisement

Katrina, Aishwaryaनंतर 'ही' अभिनेत्री साकारणार चोराची भूमिका

कोण आहे ती अभिनेत्री...  

Katrina, Aishwaryaनंतर 'ही' अभिनेत्री साकारणार चोराची भूमिका

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेत्री कतरिना कैफ या दोघींनी 'धूम' चित्रपटांच्या भागांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. धूम चित्रपटांच्या सर्वच भागांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता चाहते 'धूम 4' चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. यश राज फिल्म्स (YRF) 'धूम 4' (Dhoom 4) चित्रपटाची घोषणा करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिवाय ऐश्वर्या आणि कतरिनाने धूमच्या आधीच्या भागांमध्ये चोराची भूमिका साकारली होती. 

fallbacks

आता बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोण 'धूम 4'मध्ये चोराची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगत आहे. फिल्म मेकर्स चित्रपटासाठी दीपिकासोबत बोलणी करत आहेत. जर चित्रपटासाठी दीपिकाने होकार दिला, तर चाहत्यांना तिचा चोराच्या भूमिकेत पाहता येईल. 

सध्यातरी चित्रपटाच्या निर्मात्यांना याविषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. दीपिका लवकरच शकुन बत्रा यांच्या 'महाभारत' आणि 'पठान' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शिवाय ती अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत देखील स्क्रिन शेअर करणार आहे. मात्र या चित्रपटाच्या शिर्षकावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही.

Read More