Marathi News> मनोरंजन
Advertisement

तुमच्या असण्यानेच...; रणवीर नव्हे, तर दुसऱ्याच खास व्यक्तीसाठी दीपिका भावूक

अन्यथा मी आहे त्याहून थोडीथोडकीही दिसले नसते... 

तुमच्या असण्यानेच...; रणवीर नव्हे, तर दुसऱ्याच खास व्यक्तीसाठी दीपिका भावूक

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण ( Deepika padukone) हिनं पहिल्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. शांतिप्रिया होऊन रुपेरी पडद्यावर झळकलेली ही सौंदर्यवती राणी पद्मावती आणि मस्तानीच्या रुपातही तितकीच प्रभावी ठरली. दीपिकाच्या या कारकिर्दीदरम्यानच तिला रणवीर सिंह याच्या रुपान आयुष्य भराचा जोडीदार मिळाला. या दोघांनीही रुपेरी पडदा गाजवला. अशा या जोडीला दमदार रुपात प्रेक्षकांसमोर आणण्यास काही चेहरे कारणीभूत ठरले. 

अशाच चेहऱ्यांपैकी एक म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali). दीपिकाच्या जीवनात महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या काही व्यक्तींपैकी हे एक खास नाव. एक अभिनेत्री म्हणून दीपिका घडत असतानाच तिच्यातील कला भन्साळींनी ओळखली आणि या अभिनेत्रीला आपल्या चित्रपटात संधी दिली. 'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' अशा चित्रपटांतून भव्य कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आल्या आणि पाहता पाहता दीपिकानं हिंदी चित्रपटविश्वात दबदबा निर्माण केला. 

भन्साळींच्या याच विश्वासापोटी त्यांचे आभार मानत आणि त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दीपिकानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. एक व्यक्ती म्हणून मी आज जी काही आहे ते भन्साळींमुळेच. अन्यथा मी आहे त्याहून थोडीथोडकीही दिसले नसते, जर संजय लीला भन्साळी हे नावच नसतं, अशा शब्दांत दीपिकानं एक पत्रवजा पोस्ट लिहिली. 

fallbacks

 

पहिल्या चित्रपटात त्यांनी आपली निवड कशा प्रकारे केली इथपासूनचा प्रवास अतिशय भावनिकरित्या शब्दांत गुंफला. भन्साळींसाठी तिनं लिहिलेली ही पोस्ट वाचताना लगेचच त्यातून व्यक्त केलेले कृतज्ञतेचे भाव आपल्या समोर येतात. 

Read More