Marathi News> मनोरंजन
Advertisement

तापानं फणफणत तो निपचित पडलेला; 11 महिन्यांच्या लेकाला पाहून अभिनेता व्याकुळ

पाहा काय झालेली त्याची अवस्था   

तापानं फणफणत तो निपचित पडलेला; 11 महिन्यांच्या लेकाला पाहून अभिनेता व्याकुळ

मुंबई : कोरोनाचा झपाट्यानं वाढणारा संसर्ग सध्या भल्याभल्यांना आपल्या विळख्यात घेत आहे. या विषाणूपासून आता तर लहान मुलंही प्रभावित होऊ लागली आहेत. अभिनेता नकुल मेहता आणि पत्नी जानकी पारेख यांच्या मुलालाही या संसर्गाचा बराच त्रास झाला. त्याला थेट रुग्णालयही गाठावं लागलं होतं. (Corona Nakul Mehta son)

जीवनातील त्या अत्यंत कठीण प्रसंगाला आठवून नकुल घामानं ओलाचिंब होतो. एका मुलाखतीत त्यानं आणि त्याच्या पत्नीनं याचा खुलासा केला. 

नकुलला सर्वात आधी कोरोनाची लागण झाली. ज्यानंतर त्याची पत्नीही कोरोनाच्या विळख्यात सापडली. 

या दोघांनीही त्यानंतर विलगीकरणात राहत उपचार घेतले. आपल्या लहान मुलाला, सुफीलाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो याची कुणकुण त्याच्या पत्नीला लागली होती. 

सुफीला सुरुवातीला हलका ताप आला, पण त्याचा ताप वाढत गेला तेव्हा मात्र नकुल आणि जानकी हे दोघंही घाबरले. 

'आमच्या बाळाला ताप येऊ लागला तेव्हा आम्ही त्याचं निरिक्षण करु लागलो. डॉक्टरांच्या सांगण्यावरुन त्याला गरम पाण्याने पुसून घेतलं. 

पण, प्रत्येक जाणाऱ्या क्षणाला त्याचा ताप वाढत चाललेला. त्याला रुग्णालयात न्यावं लागलं. 

धडकी यामुळं भरलेली की तो तापानं फणफणत होता आणि निपचित पडलेला होता', नकुलची पत्नी जानकी म्हणाली. 

नकुलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्या क्षणापासून तो घरात होता. पण, जानकी बाळासाठी रुग्णालयात गेली होती. 

तिथे तिचं शरीरसुद्धा उत्तर देऊ लागलं होतं. त्याच्या अनेक रक्तचाचण्या करण्यात आल्या, IV चाही आधार घेतला गेला. 

सरतेशेवटी काही दिवसांनी त्याने उपचारांना उत्तर देण्यास सुरुवात केली आणि तो सावरु लागला. 

Read More