Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिल्पा शेट्टी आणि पती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

शिल्पा आणि राजने आता कोणाची केली फसवणूक, कोणती होती डिल?

शिल्पा शेट्टी आणि पती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योजक राज कुंद्रा, काशिफ खान यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नितीन बरई यांनी  तक्रार दाखल केली त्यावरून फसवणुकीच्या आरोपाखाली शिल्पा शेट्टी,राज कुंद्रा आणि काशिफ खानसह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिटनेस डिलमधले पैसे परत मागताना धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर आता फसवणुकीच्या आरोपांमुळे राज आणि शिल्पा पुन्हा अडचणीत अडकण्याची शक्यता  आहे. 

दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणात राज तब्बल दोन महिने जेलमध्ये होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर तो सोशल मीडिया आणि माध्यमांपासून दूर होता. एवढंच नाही तर राजने स्वतःचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केल्याचं देखील कळालं. पण काही दिवसांपूर्वी तो शिल्पासोबत देवदर्शन करताना दिसला. तेव्हा पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर तो पहिल्यांदा सर्वांच्या समोर आहे. 

राज कुंद्रा तुरुंगात गेल्यापासून शिल्पा शेट्टीचे आध्यात्मिक रूप सर्वांसमोर आले. पती-पत्नी दोघेही धर्मशाळेतील बगलामुखी मंदिरात गेले. तेथे त्यांनी तांत्रिक पूजा केली. मंदिरातून दोघांचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते.

Read More