Marathi News> मनोरंजन
Advertisement

टीव्हीच्या 'संजय दत्त'ने रणवीरला बनवलं 'संजू'

सिनेमाचं शूटींग होण्याच्या ४ महिने आधी रणवीरशी माझी भेट झाल्याचे डॉ. संकेत भोसले याने सांगितले. 

टीव्हीच्या 'संजय दत्त'ने रणवीरला बनवलं 'संजू'

मुंबई : संजय दत्तचे कॅरेक्टर साकारण्यासाठी रणवीरला कॉमेडियन डॉ. संकेत भोसले याने मदत केली आहे. 'संजय दत्त' नावाने सगळीकडे प्रसिद्ध असलेल्या संकेतची मदत रणवीरला घ्यावी लागली. सिनेमाचं शूटींग होण्याच्या ४ महिने आधी रणवीरशी माझी भेट झाल्याचे डॉ. संकेत भोसले याने सांगितले. रणवीरसाठी संजय दत्तचे कॅरेक्टर उभ करण्याची जबाबदारी डॉ. संकेत याला देण्यात आली होती. आपण कॉमेडियन होण्यासोबतच डॉक्टरही असल्याचे रणवीरला समजल्यावर त्याला धक्का बसल्याचे डॉ. संकेतने सांगितले. ३ तास एका रुममध्ये बसून रणवीरने संजयचा लुक आणि त्याच्या बोलण्याच्या टेक्निकवर काम केल्याचेही डॉ. संकेत याने सांगितले. 

संजय दत्त यांच्या आयुष्यावर  आधारित चित्रपट राजकुमार हिरानी रसिकांसमोर लवकरच घेऊन येणार आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरने मेहनत घेतली आहे.

रिलीज डेट 

या सिनेमात रणबीर कपूरशिवाय परेश रावल, दिव्या दत्ता, सोनम कपूर, अनुष्का शर्मा आणि करिश्मा तन्ना यांसारखे कलाकार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून हा सिनेमा २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पूर्वी हा सिनेमा ३० मार्च रोजी रिलीज होणार होता.

वडील मुलाचे नाते

संजू सिनेमात परेश रावल, संजय दत्तच्या वडीलांची म्हणजेच सुनील दत्त यांची भूमिका साकारत आहे. पोस्टरवर रणबीर खूप घाबरलेला दिसत आहे. तर परेश रावल यांनी त्याला मिठीत घेतले आहे. यातून मुलगा आणि वडील यांच्यातील बॉन्डींग दिसते. त्याचबरोबर संजूच्या वाईट काळात वडीलांनी त्याला कसे सांभाळले हे ही दिसून येते.

Read More