Marathi News> मनोरंजन
Advertisement

सदाशिव अमरापुरकरचां जावई आहे प्रसिद्ध शेफ

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रसिद्ध शेफ यांच्या नावे 

सदाशिव अमरापुरकरचां जावई आहे प्रसिद्ध शेफ

मुंबई : सदाशिव अमरापुरकर हे मराठी तसेच हिंदी सिनेमातील मोठं नाव. आपल्या अभिनयाने आजही सदाशिव अमरापुरकर प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करणारे सदाशिव अमरापुरकर यांनी साकारलेले सगळेच कॅरेक्टर लोकप्रिय ठरले. सदाशिव अमरापुरकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. 

fallbacks

सदाशिव अमरापुरकर यांचे जावई हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध शेफ आहेत. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर हे ज्येष्ठ अभिनेता सदाशिव अमरापुरकर यांचे जावई आहेत. केतकी अमरापुरकर या सदाशिव अमरापुरकर यांची मुलगी. 

सदाशिव अमरापुरकर आणि सुनंदा अमरापुकर यांनी तीन मुली. केतकी, सायली आणि रिमा. यातील मोठी मुलगी केतकी यांच शेफ देवव्रत जातेगावकर यांच्याशी अरेंज मॅरेज झालं आहे. केतकी आणि देवव्रत नुकतेच 'झी मराठी' वरील 'होममिनिस्टर'या लोकप्रिय कार्यक्रमात विशेष भागात केतकी अमरापुरकर- जातेगावकर आणि शेफ देवव्रत जातेगावकर उपस्थित होते. या निमित्ताने पुन्हा सदाशिव अमरापुरकर यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. 

fallbacks

केतकी अमरापुरकर- जातेगावकर आणि देवव्रत जातेगावकर यांना मिरा ही गोंडस मुलगी आहे. शेफ देवव्रत जातेगावकर 'झी मराठी'वरील 'आम्ही सारे खवय्ये' टीमचा भाग आहेत. यामध्ये देवव्रत चाहत्यांना नवनवीन रेसिपी बनवून दाखवतात. उत्तम जेवण बनवण्याबरोबरच त्याची सुंदर सजावट करणं देखील महत्वाचं असतं. कारण एखादा पदार्थ आपण नजरेने पहिला पाहतो आणि मग तो खातो त्यामुळे त्याचं सादरीकरण खूप महत्वाचं असतं. आणि यामध्ये शेफ देवव्रत यांचा हातखंड आहे. 

Read More