Marathi News> मनोरंजन
Advertisement

अक्षय कुमारची खिल्ली उडवत निलेश साबळे, म्हणाला 'तीन महिन्यात...'

शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अक्षय कुमारची खिल्ली उडवत निलेश साबळे, म्हणाला 'तीन महिन्यात...'

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात फक्त मराठी कलाकार नाही तर बॉलिवूड कलाकारा देखील हजेरी लावतात. नुकताच या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. 

त्याचे प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओत निलेश साबळे अक्षय कुमारचं बँड बाजानं स्वागत करताना दिसतो. त्यानंतर निलेश साबळे अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटातील त्याच्या एण्ट्रीचा सीन विनोदी पद्धतीनं करून दाखवतो. चित्रपटात अक्षयनं हेलिकॉप्टरनं एण्ट्री करतो तर निलेश पंखा घेऊन एण्ट्री करतो. भारत गणेशपुरे निलेशला पाहताच हा हेलिकॉप्टर आहे का? असा प्रश्न विचारतो. 

यावर उत्तर देत निलेश बोलतो, “गेल्यावेळी मला अक्षय सरांनी सांगितलं होतं की मी तुमच्याकडे आतापर्यंत तीन वेळा आलोय, जेव्हा मी पुढच्यावेळी येईन तेव्हा दोन गोष्टी बदला. पहिलं तर अक्षय कुमार बदला आणि दुसरं म्हणजे माझी एण्ट्रीही थोडी धमाकेदार करा. काहीतरी चांगलं करा, थोडा खर्च करा, इतका चांगला शो आहे.' 

पुढे निलेश म्हणाला, 'नक्कीच सर तुम्ही पुढच्यावेळी जेव्हा शोमध्ये याल तोपर्यंत आम्ही पैसे जमा करु आणि एखादा हेलिकॉप्टर खरेदी करु. त्यातून मी एण्ट्री करेन. त्यावर भारत गणेशपुरे त्याला सांगतात, अरे हा नुसता पंखा आहे.” यावर निलेश साबळे म्हणतो, 'तीन महिन्यात नवीन चित्रपट घेऊन आले, तोपर्यंत आमचं एवढंच बजेट जमलं. थोडं थांबले असते तर आम्ही घेतलं असतं.' हे ऐकताच अक्षयलाही हसू अनावर होतं. हा व्हिडीओ सध्यो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी करीना कपूर आणि आमिर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक यातील कोणत्या चित्रपटाला पसंती देतात, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More