Marathi News> मनोरंजन
Advertisement

इंटीमेट सीन शुट करताना Nawazuddin Siddiqui ची झाली अशी अवस्था; कुब्रा सैतने सांगितला KISS वाला किस्सा!

Kubbra Sait on Sacred Games scene: 'साक्रेड गेम्स' (Sacred Games) या वेब सीरिजने प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री कुब्रा सैतने (Kubbra Sait) नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या (Nawazuddin Siddiqui) तिच्या इंटिमेट सीन्सबाबत एक रंजक खुलासा केला आहे.

इंटीमेट सीन शुट करताना Nawazuddin Siddiqui ची झाली अशी अवस्था; कुब्रा सैतने सांगितला KISS वाला किस्सा!

Nawazuddin Siddiqui, Kubbra Sait: ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे वेबसिरीजचं (Web Series) नवं मार्केट सुरू झालं. तुम्ही पाहिलेली पहिली वेबसिरीज कोणती असा सवाल जर विचारला तर, अनेकांच्या तोंडी नाव येतं ते साक्रेट गेम्स... दिग्दर्शक अनुराग कश्यप, नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui), सैफ अली खान या तीन त्रिकुटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला नवी ओळख निर्माण करून दिली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

'साक्रेड गेम्स' (Sacred Games) या वेब सीरिजने प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री कुब्रा सैतने (Kubbra Sait) यातील तिच्या इंटिमेट सीन्सबाबत एक रंजक खुलासा केला आहे. इंटीमेट सीनमुळे (Intimate Scene) ही सिरीज अनेकांच्या लक्षात राहिली. त्यात महत्त्वाचं कॅरेक्टर होतं ते म्हणजे कुकू म्हणजेच कुब्रा सैत हिचं... कुब्राने या सिरीजमधील इंटिमेट सीनवर मोठा खुलासा केलाय.

काय म्हणाली Kubbra Sait ?

सिरीजचा इंटिमेट सीन पहिल्याच दिवशी शूट झाला होता. पहिल्या दिवसाचा हा शेवटचा सीन होता. माझं स्पष्ट होतं,  मला फक्त जाऊन सीन पूर्ण करायचाय. हा सीन पूर्ण करण्यासाठी आम्ही 7 रिकेट घेतले. अखेरीस मी जमिनीवर पडले आणि रडत होते. मी थकले होते, उठू शकले नाही. त्यावेळी नवाजुद्दीन आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी मला उचललं आणि कट म्हणाले, असं कुब्रा सांगते.

मला नवाजुद्दीन खूप आवडतो. तो एक चांगला सहकलाकार आहेच, पण तो चांगला व्यक्ती देखील आहे. आम्ही ते सगळे इंटिमेट सीनही एकत्र केले. मला वाटतं की तो या पृथ्वीवरील सर्वात लाजाळू व्यक्ती आहे, असं कुब्रा म्हणते. त्याला पकडून हा सीन करावा लागत होता. त्याला गालावर किस केलं आणि त्याला म्हणाले चल ना सेक्स करूया... ते माझं काम होतं आणि मी ते चांगल्या पद्धतीने केलं, असंही कुब्राने सांगितलं.

आणखी वाचा - Netflix वरील मर्यादा ओलांडणाऱ्या 'या' सहा Web Series एकट्यातच पाहा!

दरम्यान, 2018 साली साक्रेट गेम्सचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यावेळी काही इंटीमेट सीन शुट करण्यात आले होते. प्रत्येक सीननंतर अनुराग कश्यप माझी माफी मागत होता, असंही कुब्रा सैतने यावेळी सांगितलं. साक्रेट गेम्स ही वेबसिरीज दोन भागात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिरीजने मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.

Read More