Marathi News> मनोरंजन
Advertisement

Chak de India: शाहरूख खानसोबत काम केलेली 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, राजकारणाशीही आहे खास कनेक्शन

Chak de India: चक दे इंडिया हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. हा चित्रपट लहानपणी एक नाही तर हजार वेळा तरी आपण पाहिला असेलच. या चित्रपटातील ती डॅशिंग लहान मुलगी तुम्हाला आठवतं असेलच. 

 Chak de India: शाहरूख खानसोबत काम केलेली 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, राजकारणाशीही आहे खास कनेक्शन

 Actress Chitrakshi Rawat Going to Marry Soon: सध्या सगळीकडेच लग्नसभारंभांचा मोहोल आहे त्यामुळे सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रेंटीपर्यंत (Celebrity Wedding) सगळेच विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. सेलिब्रेटींच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरलही होताना दिसतात. त्यामुळे इंटरनेटवर (Internet) सध्या अशाच काही सेलिब्रेटी वेडिंग स्टोरीज या व्हायरल होत आहेत. अगदी मराठी सेलिब्रेटींपासून ते हिंदी आणि दाक्षिणात्त्य सेलिब्रेटींपर्यंत अनेक लोकं सध्या विवाह बंधनात अडकताना दिसत आहेत. त्यातून सिनेसृष्टीतील सेलिब्रेटी म्हणा वा टेलिव्हिजनमधील सेलिब्रेटी, सध्या सगळ्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ हे इन्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. त्यात आता आणखीनं एका लोकप्रिय अभिनेत्रीचे नावं पुढे आले आहे. 

चक दे इंडिया (Chak de India) हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. हा चित्रपट लहानपणी एक नाही तर हजार वेळा तरी आपण पाहिला असेलच. या चित्रपटातील ती डॅशिंग लहान मुलगी तुम्हाला आठवतं असेलच. कौमल चौटला हे पात्र तिनं चित्रपटातून साकार केले होते. तिच्या अभिनयानंही तिनं आपल्या चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. सध्या तिचे काही फोटोज हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कौमल आणि प्रिती अशी जोडी या चित्रपटातून समोर आली होती. त्याच्यातील चुरस ही चित्रपटामधून दाखवण्यात आली होती मग त्या दोघी टीमसाठी कशा एकत्र येतात असा त्या दोघींचा क्लयामॅक्स सीन होता आणि शेवटी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात टीम इंडिया मॅच जिंकते असा चित्रपटाचा शेवट होता. 

ध्रुवादित्य भागवनानीशी चित्राक्षी (Chirakashi Rawat) येत्या 4 फेब्रवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या तिचे बॅचलर पार्टीमधील अनेक फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी चक दे इंडिया चित्रपटातील कलाकारांनाही हजेरी लावली होती तर अनेक बॉलिवूड तारेतारकांचीही मांदियाळी होती. ध्रुवादित्य भागवनानी हा सुद्धा एक अभिनेता आहे. गेली 11 वर्षे ते एकमेकांना डेट करत आहेत. 2012 साली त्यांची भेट एका सेटवर झाली होती. चक दे इंडिया चित्रपटानंतर चित्राक्षीनं लक, ब्लॅक होम आणि फॅशनसारख्या चित्रपटांतून भुमिका केल्या आहत. सध्या तिचे फोटोज हे चर्चेचा विषय ठरले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहरूख खानच्या चक दे इंडिया या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. सध्या शाहरूख खानच्या (Sharukh Khan Pathan) पठाण या चित्रपटाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. या चित्रपटानं आतापर्यंत 600 कोटीहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. 

Read More