Marathi News> मनोरंजन
Advertisement

फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुकलीला तुम्ही ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अनेक स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर फिरत असतात. 

फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुकलीला तुम्ही ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री

मुंबई :  अनेक स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर फिरत असतात. काही स्टार्सना ओळखणं खूप सोपं असतं. तर अनेक स्टार्सना ओळखण्यात चाहत्यांना घाम फुटतो. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या अभिनेत्रीची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही अभिनेत्रीही याच कारणामुळे चर्चेत आली होती. लग्नाच्या काही दिवसांनंतर  तिने बेडरूममधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. जो खूप व्हायरलही झाला होता. आता एवढ्या हिंट देवून तुम्ही या अभिनेत्रीचं नाव सांगू शकता का?

कोण आहे ही मुलगी?
या फोटोमध्ये दिसणारी मुलगी खूपच क्यूट दिसत आहे.  या मुलीने लाल आणि पांढर्‍या रंगाचा फ्रॉक घातला आहे. याचबरोबर तिने कपाळावर एक छोटीशी टिकली लावली आहे आणि चेहऱ्यावर गोड स्माईल असलेली ही मुलगी इतकी क्यूट दिसतेय की, या मुलीचा गोंडसपणा पाहून कोणीही तिचा चाहता होईल.

तुम्ही ओळखलं का?
या निरागस चिमुरडीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्हाला माहित आहे का? ही अभिनेत्री कोण आहे? नसेल तर अजिबात काळजी करू नका, आम्ही तुम्हाला या मुलीचं नाव सांगतो. ही मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून 'गम है किसी के प्यार में' या प्रसिद्ध मालिकेतील पाखी आहे. म्हणजेच तुमची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आहे.

fallbacks

लग्नानंतर बेडरूममधील फोटो शेअर केला
'गम है किसीके प्यार में' या मालिकेत ऐश्वर्या शर्मा नकारात्मक भूमिकेत आहे. पाखीने काही महिन्यांपूर्वी या मालिकेत विराटची भूमिका साकारणाऱ्या नील भट्टसोबत लग्न केलं होतं. विशेष म्हणजे पाखीने लग्नाच्या दोनच दिवसांनंतर पती नीलसोबतचा तिच्या बेडरूमचा एक फोटो शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता.

Read More