Marathi News> मनोरंजन
Advertisement

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन सेलिब्रिटी कमावतात बक्कळ पैसे

आपण इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करतो, पण सेलिब्रिटी फक्त एका फोटोसाठी घेतात बक्कळ पैसे  

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन सेलिब्रिटी कमावतात बक्कळ पैसे

मुंबई : बॉलीवूड स्टार्स एका सिनेमासाठी बक्कळ मानधन घेतात. एका सिनेमातून कोट्यवधी रुपये कमावणाके कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मालामाल होतात. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी कलाकारांना पैसे मिळतात. आज अशाच काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत, जे फक्त सिनेमांतून नाही, तर सोशल मीडियावर पोस्टवरून देखील कोट्यवधी रुपये कमावतात. 

समंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu)
प्रसिद्ध अभिनेत्री समंथा हिला इंस्टाग्रामवर 23.9 मिलियन लोक फॉलो करतात. रिुपोर्टनुसार समंथा प्रमोशनल पोस्ट शेअक करण्यासाठी ब्रँडकडून 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेते.

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)
बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियंकाचे . इंस्टाग्रामवर 79.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. एका सिनेमातून बक्कळ पैसे कमावणारी प्रियंका इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी सुमारे 1.80 कोटी रुपये मानधन घेते.

आलिया  भट्ट (Alia Bhatt)
बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्टचे इंस्टाग्रामवर 66.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी एक कोटी रुपये मानधन घेते.

शाहरूख खान (Shahrukh Khan)
बॉलीवुडचा बादशाहा शाहरूख खानला इन्स्टाग्रामवर 29.8 मिलियन लोक फॉलो करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी 80 लाख रुपये मानधन घेते.

Read More