Marathi News> मनोरंजन
Advertisement

दोन अठवड्यानंतरही 'तान्हाजी' अव्वल

प्रेक्षकांचा कल मात्र 'तान्हाजी..'कडेच दिसत आहे.   

दोन अठवड्यानंतरही 'तान्हाजी' अव्वल

मुंबई : 'तान्हाजी' चित्रपट सलग दुसऱ्या आठवड्यातही रूपेरी पडद्यावर आपली जादू दाखवत आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा अजूनही चढत्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पादूकोण स्टारर 'छपाक' चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. समीक्षकांनी दीपिकाच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला असला, तरी प्रेक्षकांचा कल मात्र 'तान्हाजी..'कडेच दिसत आहे. 

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे बॉक्स ऑफिसवर शेअर केले आहेत. या आठ दिवसांमध्ये 'तान्हाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२५ कोटी रूपयांचा गल्ला पार केला आहे. येत्या काही दिवसांत चित्रपट अधिक  कमाई करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर या आठ दिवसांत 'छपाक'ने फक्त २६.५० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे

सैफ अली खान, अजय देवगन, काजोल, शरद केळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या Tanhaji The Unsung Warrior या चित्रपटाने दीपिका पदुकोणच्या 'छपाक' या चित्रपटाला तगडं आव्हान दिलं आहे. सुरुवातीला या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत काहीसा कमी वेग पकडला होता. पण, 'तान्हाजी' चित्रपटापुढे 'छपाक' फेल ठरला.

मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' या चित्रपटामध्ये लक्ष्मी अग्रवाल या ऍसिड हल्ला पीडितेच्या संघर्षावर आणि तिच्या जिद्दीवर प्रकाश टाकणारी कथा साकारण्यात आली आहे. एकिकडे चर्चा आणि गाजावाजा होऊनही कमाईच्या बाबतीत 'छपाक' Chhapaak काहीसा मागे पडल्याचं दिसत असतानाच दुसरीकडे 'तान्हाजी'ची घोडदौड मात्र चांगल्या वेगाने सुरु आहे हे खरं.

Read More