Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सुपर ३०' चित्रपटाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे!

'सुपर ३०' चित्रपटाच्या कमाईचा आकडा सलग दुसऱ्या आठवड्यात चढत्या क्रमावर आहे.

'सुपर ३०' चित्रपटाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिनेता हृतिक रोशन स्टारर 'सुपर ३०' चित्रपटाच्या कमाईचा आकडा सलग दुसऱ्या आठवड्यात चढत्या क्रमावर आहे. चित्रपटाने पहिल्या अठवड्यात ७५.८५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर चित्रपटाने आठव्या दिवशी ४.५१ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली. 'सुपर ३०' चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यात सतत वाढ होत आहे.

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. १९ जुलैला चित्रपटगृहात  दाखल झालेल्या 'सुपर ३०'ने ८०.३६ कोटींचा गल्ला जमा केला आहे. तर हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात १०० कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 लहान मुलांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न, लहान डोळ्यांना मोठे स्वप्न पाहाण्यासाठी असलेले अधिकार, कोणत्याही असंभव गोष्टीला संभव करण्याची इच्छा इत्यादी गोष्टींच्या भोवती 'सुपर ३०' चित्रपटाची कथा फिरत आहे.

अभिनेता हृतिक रोशन चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील चित्रपटात महत्वाची भूमिका बजावत आहे.  

Read More