Marathi News> मनोरंजन
Advertisement

'कबीर सिंग'च्या कमाईला पुन्हा उसळी

'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरला आहे.

'कबीर सिंग'च्या कमाईला पुन्हा उसळी

मुंबई : 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. यंदाच्या वर्षीच्या 'अडल्ड' चित्रपचांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या 'कबीर सिंग'च्या कमाईचा आकडा सलग चढत्या क्रमावर आहे. मागील दोन आठवड्यांपासून कबीरच्या उध्वस्त झालेल्या प्रेमाची कहाणी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी स्टारर चित्रपटाची लोकप्रियता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. चित्रपट सलग १६व्या दिवशी २२६.११ कोटींच्या घरात पोहोचला आहे.  

'कबीर सिंग' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल १३२.४२ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने १९८.९५ कोटींच्या घरात पोहोचला. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. 

त्याचबरोबर 'पद्मावत', 'सुलतान', 'संजू', 'बजरंगी भाईजान', 'टायगर जिंदा है' या एकापेक्षा एक चित्रपटांना देखील 'कबीर सिंग' चित्रपटाने मागे टाकले आहे. भारत देशात 'कबीर सिंग' एकूण ३ हजार १२३ चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. 'कबीर सिंग' चित्रपट २०१९ मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

याआधी अभिनेता सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाने १४ दिवसात तर अभिनेता विक्की कौशलच्या 'उरी' चित्रपटाने २८ दिवसात २०० कोटींचा गल्ला पार केला होता.  'कबीर सिंग' शाहिदच्या करियरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला आहे. 

'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'कबीर सिंग'मध्ये शाहिद मध्यवर्ती भूमिकेत झळकत आहे. कियारा अडवाणी त्याच्यासोबत चित्रपटातून स्क्रीन शेअर करत आहे. प्रेमाची उध्वस्त कहाणी बॉक्स ऑफिसवर चांगलीच गाजत आहे. 

Read More