Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलग तिसऱ्या दिवशी 'छिछोरे' चित्रपटाची दमदार कमाई

'छिछोरे' चित्रपट यशाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे.

सलग तिसऱ्या दिवशी 'छिछोरे' चित्रपटाची दमदार कमाई

मुंबई : इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांवर केंद्रित असलेला 'छिछोरे' चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्ध कपूर स्टारर 'छिछोरे' चित्रपट सतत चढत्या क्रमांकावर असल्याचे दिसत आहे. श्रद्धाच्या 'साहो' चित्रपटाने सुद्धा बॉक्स ऑफीसवर दमदार कमाई केली. तर आता दुसरीकडे 'छिछोरे' चित्रपट सुद्धा यशाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे. ६ सप्टेंबरला चित्रपट गृहात दाखल झालेल्या 'छिछोरे' चित्रपटाने आता पर्यंत १९.५७ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली आहे. 

ट्रेंड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. प्रत्येकाला त्याच्या कॉलेजच्या दिवसांची, कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये केलेल्या मजा-मस्तीची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे. 

चित्रपटाचं शूटिंग एका इंजिनियरिंगच्या कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे. सुशांत, श्रद्धाने प्रमुख भूमिका साकारली असून प्रतीक बब्बर सुशांतच्या मित्राची भूमिका साकारत आहे. 'छिछोरे'चं दिग्ददर्शन 'दंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडियोज आणि साजिद नाडियावाला यांनी केली आहे.

Read More