Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयाच्या ८१व्या वर्षी वहीदा रेहमान यांनी असं काही केलं की...

एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री वहीदा रेहमान यांनी....   

वयाच्या ८१व्या वर्षी वहीदा रेहमान यांनी असं काही केलं की...

मुंबई : जीवनाच्या प्रवासात अमुक एका टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याच दिशेने मग बांधणी करत त्या वाटेवर वाटचाल सुरु करण्याकडेच अनेकांचा कल असतो. अशा वेळी काही गोष्टी किंव आवडीनिवडींकडे दुर्लक्षही होतं. पण, दुर्लक्ष झालं तरीही आपल्या स्वप्नांचाच भाग असणाऱ्या या गोष्टींना अगदी विसरुनही चालत नाही. या साऱ्याचाच सुरेख प्रत्यय येत आहे, तो म्हणजे ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री वहीदा रेहमान यांच्यावरुन. 

कायमच कॅमेऱ्यासमोर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या वहीदा रेहमान आता एक अभिनेत्री असण्यासोबतच आता वन्यजीव छायाचित्रकार म्हणजेच wildlife photographerही झाल्या आहेत. 

'रिपब्लिक'च्या वृत्तानुसार नुकतंच रेहमान यांनी केनिया, टांझानिया आणि भारतातील अनेक राष्ट्रीय अभयारण्यात टीपलेल्या काही छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं. मुंबईत पार पडलेल्या या प्रदर्शनादरम्यान माध्यमांशी संवाद साधतेवेळी त्यांनी आपल्यात दडलेल्या छायाचित्रकाराला समोर येण्यास वाव दिला. आपल्याला फोटो काढण्याची फार आवड असल्यामुळे चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळीही कायमच एक लहानसा कॅमेरा सोबत बाळगत असल्याचा खुलासा त्यांनी केला. 

सुरुवातीला रेहमान यांना त्यांनी टीपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात संकोचलेपणा वाटत होता. पण, मित्रपरिवाराच्या विनंतीचा मान राखत त्यांनी अखेर हे पाऊलही उचललं. 

fallbacks
छाया सौजन्य- idiva 

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

वन्यजीव छायाचित्रकार किंवा एक छायाचित्रकार होण्यासाठी तुम्हाला प्रचंड संयमी आणि शांत राहावं लागतं ही अतिशय महत्त्वाची टीप त्यांनी दिली. हिमांशू शेठ यांच्याकडून वहीदा रेहमान यांची फोटोग्राफीचे धडे घेतले. एक अभिनेत्री म्हणून रुपेरी पडद्यावर त्या जितक्या आत्मविश्वासाने वावरत होत्या, तितक्याच आत्मविश्वासाने आता त्या एक wildlife photographer होऊन नव्या जोमाच्या अनेकांना चांगलीच टक्कर देत आहेत, असं म्हणायला हरकत नाही. 

Read More