Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरुखच्या 'मन्नत'बाहेर जोरदार आंदोलन, 'हे' आहे कारण

Shahrukh khan Junglee Rummy: अनटच इंडिया फाउंडेशनने ऑनलाइन गेम जंगली रम्मी आणि झुप्पी अॅपच्या विरोधात आपला निषेध नोंदविला. या जाहिरातींमध्ये सामील असलेल्या कलाकारांकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

शाहरुखच्या 'मन्नत'बाहेर जोरदार आंदोलन, 'हे' आहे कारण

Shahrukh khan Junglee Rummy: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात आले आहे. अनटच इंडिया फाऊंडेशनचे सदस्य काही वेळापुर्वी शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर जमले होते. त्यांच्या गळ्यात भगवा गमछा होता. जंगली रमीच्या जाहिरातीला विरोध करण्यासाठी हे आंदोलन झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या वांद्रे पश्चिम येथील 'मन्नत' बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात आले. अभिनेता शाहरुख खानची जंगली रमीच्या जाहिरातीत अनेक माध्यमांतून पाहायला मिळत आहे. याचा सर्वांवर वाईट परिणाम होतोय. त्याने अशा प्रकारच्या जाहिरातीत काम करुन नये अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. अशा जाहिरातींना अनेक तरुण बळी पडतात. असे गेम खेळू लागल्याने अनेकांच्या घरी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

अनटच इंडिया फाउंडेशनने ऑनलाइन गेम जंगली रम्मी आणि झुप्पी अॅपच्या विरोधात आपला निषेध नोंदविला. या जाहिरातींमध्ये सामील असलेल्या कलाकारांकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

याचा निषेध म्हणून आम्ही शाहरुख खानच्या घराबाहेर आंदोलन केल्याचे आंदोलकांनी सांगितले. 

काही दिवसांपुर्वी आमदार बच्चू कडू यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या विरोधात एक पत्र विधानसभा अध्यक्षांना लिहिले होते. त्यात त्याने जुगाराच्या जाहिराती करु नये अशी मागणी केली होती. 

Read More