Marathi News> मनोरंजन
Advertisement

कोणाशी लढण्यासाठी खिलाडी कुमारच्या हाती तळपती तलवार? पाहा Video

असंच काहीसं खिलाडी कुमारसोबत घडलं आणि ....

कोणाशी लढण्यासाठी खिलाडी कुमारच्या हाती तळपती तलवार? पाहा Video

मुंबई : शत्रू समोर उभा ठाकतो तेव्हा सर्वस्व वाचवण्यासाठी मग साहस दुपटीनं एकवटतं आणि पुढे जे काही घडतं ते शब्दांच्याही पलीकडचं. असंच काहीसं खिलाडी कुमारसोबत घडलं आणि त्यानं पुढे जे केलं त्याचीच चर्चा सर्वत्र सुरु झाली. 

अक्षयनं हाती तळपती तलवार घेतली आणि त्याच सामर्थ्यानं तो रणांरगणात आला. सध्या याचा एक व्हिडीओ, अर्थात खिलाडी कुमारच्या आगामी चित्रपटाचा टीझर कमालीचा व्हायरल होत आहे. 

अक्षयच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे, 'पृथ्वीराज'. टीझरमध्ये अक्षय शूर योद्धा आणि भारतातील सर्वाच बलशाली सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'सम्राट पृथ्वीराज' यांच्या रुपात दिसत आहे. (prithviraj teaser out)

विश्वसुंदरी, मानुषी छिल्लर (Manushi Chhiller) हिसुद्धा इथं तिच्या सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ करताना दिसत आहे. मानुषीचा हा पहिलाच चित्रपट ठरत आहे. 

अवघ्या 1 मिनिट 22 सेकंदांच्या या टीझर व्हि़डीओमध्ये एका युद्धभूमीची झलक दिसत, आहे. चहूबाजूंनी घुमारा नाद, तिथं समोर येणारे शत्रू आणि अडथळ्यांना उलथून लावणारा अक्षय म्हणजे पडद्यावर दिसणारा एक शूरवीर राजाही काही क्षणांसाठी नजर खिळवून ठेवतो. 

अभिनेता संजय दत्त 'पानिपत' या चित्रपटानंतर पुन्हा एकदा इथं एका ऐतिहासिक पात्राला साकारताना दिसत आहे. मुख्य खलनायकाच्या रुपात संजूबाबा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'पृथ्वीराज'साठी साकारण्यात आलेला काळ पाहता चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज लावणं अगदी सहज शक्य होत आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

कथानक, स्टारकास्ट आणि एकंदरच सर्व गोष्टींची इथं घालण्यात आलेली सांगड पाहता बॉक्सऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल असा विश्वास निर्मात्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारी 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Read More