Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्टँडअप कॉमेडियनची कॉपी केल्यामुळे बॉलिवूडपट अडचणीत आला खरा, पण...

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला होता. 

स्टँडअप कॉमेडियनची कॉपी केल्यामुळे बॉलिवूडपट अडचणीत आला खरा, पण...

मुंबई : आयुषमान खुराना याच्या 'बाला' या चित्रपटाची चर्चा असतानाच याच चित्रपटाच्या काहीसा जवळ जाणारा आणखी एक चित्रपच प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. 'उजडा चमन' असं त्या चित्रपटाचं नाव आहे. ज्यामध्ये जवळपास ऐन तीस वर्षांच्या वयातच डोक्यावरील केस विरळ झाल्यामुळे टक्कल पडलेल्या एका युवकाला कोणकोणत्या अडचणींचा आणि अवहेलनांचा सामना करावा लागतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 

विनोदी अंदाजात आणि अतिशय प्रभाव पद्धतीने ही दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा हा ट्रेलर बराच चर्चेतही आला. सनी सिंग, मानवी गग्रू, सौरभ शुक्ला, अतुल कुमार आणि इतर सहकलाकार असणाऱ्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं तोच, आता त्याच्या वाटेत एक अडथळा आला आहे. 

चित्रपटातील काही विनोद हे आपल्या कार्यक्रमातील विनोदांशी अतिशय मिळतेजुळते असल्याचं म्हणत स्टँडअप कॉमेडियन विनय शर्मा याने एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याचे विनोद आणि ट्रेलरमधील दृश्य यांत असणारं साम्य त्याने दाखवून दिलं. 

'कालपासूनच (चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून) मला अनेक मेसेज येत होते. उजडा चमनच्या लेखकांनी अतिशय सहजपणे माझे विनोद माझ्या परवानगीशिवाय वापरले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर म्हणून हे विनोद दाखवणं पुरेसं असेल असं त्यांना वाटतं. मला आश्चर्यच वाटतं की बॉलिवूडमध्ये हा कसला नवा पायंडा पडत आहे... हे सारंकाही अतिशय निराशाजनक आहे', या शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली. 

द क्वींटच्या वृत्तानुसार मुख्य म्हणजे आता विनयने या चित्रपटाविरोधात कोणतंही पाऊल न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या लेखकांकडून मिळालेल्या स्पष्टीकरणपर पत्रानंतर दोन व्यक्ती एकाच पद्धतीने विचार करु शकतात असं म्हणत त्याने या प्रकरणाला इथेच थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 

marathi news, marathi, marathi news paper, marathi news online, marathi, samachar, marathi latest news,sports news, marathi news, marathi, marathi news online, marathi, samachar, marathi latest news, national news, national news in marathi, national

Read More