Marathi News> मनोरंजन
Advertisement

... म्हणून सलमानच्या 'दबंग ३'वर कात्री

बॉलिवूड अभिनेता Salman khan सलमान खान याचा 'दबंग ३' dabangg 3 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरीही भाईजानच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर मात्र चांगलीच जादू केली आहे. एकिकडे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे चांगला वेग पकडताना दिसतानाच दुसरीकडे या चित्रपटावर प्रदर्शनानंतर कात्री चालल्याचं म्हटलं जात आहे. 

... म्हणून सलमानच्या 'दबंग ३'वर कात्री

मुंबई : बॉलिवूड अभिनेता Salman khan सलमान खान याचा 'दबंग ३' dabangg 3 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरीही भाईजानच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर मात्र चांगलीच जादू केली आहे. एकिकडे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे चांगला वेग पकडताना दिसतानाच दुसरीकडे या चित्रपटावर प्रदर्शनानंतर कात्री चालल्याचं म्हटलं जात आहे. 

चित्रपट दोन तासांहून अधिक वेळाचा असल्यामुळे त्यावर काहींनी टीकाही केली आहे. ज्यामुळे आता जवळपास नऊ मिनिटांची दृश्य चित्रपटातून कमी करण्यात आली आहेत. चित्रपटातील गाण्यांवरही काहींनी नकारात्मक सूर आळवला आहे. गाण्यांमुळे कथानकाचा सूर मध्येच हरवत असल्याचं म्हणत ही बाजू 'दबंग ३'मधील नकारात्मक मुद्दा अधोरेखित करते. परिणामी निर्मात्यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत चित्रपटातील दृश्य नऊ मिनिटांनी कमी केली आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार आता चित्रपटगृहांमध्ये 'दबंग ३'चं नवं व्हर्जन दाखवण्यास सांगण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पूर्वार्धातील आठ ते नऊ मिनिटांता भाग कमी करण्यात आला आहे. ज्यामध्ये 'आवारा' या गाण्याचा समावेश असून, 'नैना लढे'चाही काही भाग कमी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

वाचा : सलमानच्या 'दबंग'शाहीचा बॉक्स ऑफिसवर दणका

सलमान खान, सोनाक्षी सिन्हा यांच्या भूमिका असणाऱ्या 'दबंग ३'मधून यावेळी सई मांजरेकर या नवोदित अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. महेश मांजरेकर यांची कन्या सई हिच्या अभिनाची अनेकांनीच प्रशंसा करत या चित्रपटाच्या जमेची बाजू म्हणूनही तिचा उल्लेख केला आहे. पदार्पणाच्याच चित्रपटातून अशा प्रतिक्रिया सईच्या कारकिर्दीला चांगली गती देणाऱ्या ठरु शकतात असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

Read More