Marathi News> मनोरंजन
Advertisement

तरुण दिसण्यासाठी काहीपण....मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात बॉलिवूडकरही मागे नाहीत

तरुण दिसण्यासाठी कोणत्या अभिनेत्याने कोणती शस्त्रक्रिया केली आहेत. ते पाहुयात

तरुण दिसण्यासाठी काहीपण....मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात बॉलिवूडकरही मागे नाहीत

मुंबईः प्रत्येकाला आपण कायमच सुंदर आणि तरुण दिसावं असं वाटतं, त्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करत असतो. कुणी जीम, डाएट तर कुणी थेट शस्त्रक्रिया..

बॉलिवूड अभिनेत्री तर सर्रास छोट्या-छोट्या शस्त्रक्रिया करून चर्चेत असतात. कधी ओठ, कधी नाक, गालाची शस्त्रक्रिया आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी केल्याचं आपणं ऐकलं आहे.मात्र बॉलिवूड अभिनेतेही शस्त्रक्रिया करण्यात मागे नाहीत. तरुण दिसण्यासाठी कोणत्या अभिनेत्याने कोणती शस्त्रक्रिया केली आहेत. ते पाहुयात

fallbacks

शाहिद कपूर बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. शाहिदचा क्यूटनेस आणि रावडी लूक या दोन्ही गोष्टी सर्वांनाच आवडतात. पण शाहिदनेही खूप आधी प्लास्टिक सर्जरी केली आहे. शाहिद कपूरने नाकाची शस्त्रक्रिया केल्याची माहिती आहे.

fallbacks

सैफ अली खानने अनेकवेळा बोटॉक्स उपचार केल्याचं बोललं जातं. सैफच्या लूकवर प्रश्न उपस्थित झाले होते जेव्हा अनेकांना असा विश्वास होता की त्याने चेहऱ्याची शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रिया करून सैफने त्याच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं शस्त्रक्रियेद्वारे काढली आहेत. सैफचे आधीचे आणि आताचे फोटो बघितले तर फरक दिसून येतो. 

fallbacks

रणबीर कपूरबद्दल असं म्हटले जातं की, त्याचं हेअर ट्रान्सप्लांट झालंय. हेअरलाईन फिक्स करण्यासाठी रणबीरने हे हेअर ट्रान्सप्लांट केलं. जर तुम्ही रणबीरचे जुने फोटो पाहिले तर तुम्हाला कळेल की त्याची हेअरलाईन खूप वाकडी होती. 

fallbacks

सलमान खाननेही एका मुलाखतीत त्याच्या हेअर ट्रान्सप्लांटबद्दल कबुली दिली होती. तसंच सलमानने बोटॉक्स आणि चीक फिलरही करून घेतल्याचं सांगण्यात येतं.

fallbacks

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबद्दल सांगायचं तर, आमिरची कॉस्मेटिक सर्जरी झाली आहे. याच्या मदतीने त्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर केल्या.

fallbacks

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानबद्दल असेही सांगितले जातं की, त्याने बोटॉक्स आणि इतर इंजेक्शनच्या मदतीने स्वतःला तरुण बनवलं आहे. 

fallbacks

या यादीत सर्वात धक्कादायक नाव कोणाचे असेल तर ते अक्षय कुमारचे आहे. अक्षयनेही केस गळू लागल्याचं लक्षात आल्यानंतर हेअर ट्रान्सप्लांट केलं..

Read More