Marathi News> मनोरंजन
Advertisement

Guess Who : फोटोतल्या या Bollywood Couple ला ओळखलंत का ? लहाणपणी पाहा किती होते क्यूट!

सध्या सोशल मीडियावर हिंदी सेलिब्रेटींची. सध्या त्यांच्या प्रत्येक नव्या फोटोंनी त्यांच्या चाहत्यांना वेड लावले आहे. 

Guess Who : फोटोतल्या या Bollywood Couple ला ओळखलंत का ? लहाणपणी पाहा किती होते क्यूट!

Guess Who: सध्या सोशल मीडियावर (Social Media) आपण लहानपणीच्या कलाकारांचे फोटो (Childhood Photos) पाहतच असतो. आपल्याला त्यांचे फोटो पाहून कायमच असा प्रश्न पडतो की की टीव्ही किंवा सिने कलाकारा लहानपणी किती क्यूट होते ना. सध्या अशा एक फेमस बॉलीवूडच्या जोडीचा लहानपणीचा फोटो व्हायरल (Bollywood Couple Childhood Photo) झाला आहे. आजकाल जमाना आहे तो फोटोजचा त्यामुळे आपल्यालाही सेलिब्रेटींच्या रूटीनपासून ते त्यांच्या पर्सनल आणि प्रायव्हेट लाईफपर्यंत त्यांचे हरएक फोटो (Personal Life Bollywood Celebs) पाहायची इच्छा असते. त्यात त्यांच्या लहानपणीचे फोटो पाहायला तर आपल्याला कायमच आवडतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल (Viral Photo) होतो आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही त्या गोड कपलची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. एक वर्षांपुर्वी कोणालाही कसलाच थांगपत्ता नसताना या जोडीनं आपलं लग्न गुपचूप उरकवलं. ही जोडी कोणती हे तुमच्या लक्षात आले असेलच. (bollywood couple katrina kaif and vicky kaushal childhood photos goes viral)

तुम्हाला लक्षात आली नसेल तर आम्ही तुम्हाला आठवण करून देतो ही जोडी आहे बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांची. मागच्या वर्षी या दोघांच्या अफेअरच्या कोण चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे ही जोडी मागचं संपुर्ण वर्ष जबरदस्त ट्रेण्डमध्ये (Trending) होती. लग्नाच्या चर्चांचा तर इंटरनेटवर नुसता पाऊस (Internet) पडत होता. शेवटी या जोडीनं 9 डिसेबंरला आपली लग्नगाठ बांधलीच (Wedding) आणि सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून सोडलं. आता लवकरच त्यांच्या लग्नाची वर्षपुर्ती होणार आहे. आता तुम्हाला समजले असेल की आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते... फोटोत दिसणारी ही दोन निरागस मुले दुसरी कोणी नसून कतरिना कैफ आणि विकी कौशल (Vikat) आहेत.

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

सध्या सोशल मीडियावर हिंदी सेलिब्रेटींची. त्यात विकी कौशल आणि कतरिना कैफ (Vicky Kaushal and Katrina Kaif Wedding) मागे कसे पडतील. त्यांच्या प्रत्येक नव्या फोटोंनी त्यांच्या चाहत्यांना वेड लावले आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. केवळ चाहतेच नाही तर हे सेलिब्रिटीही (Bollywood Celebs Photos) त्याचे कौतुक करताना थकत नाहीत.त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवर त्या दोघांचे एकत्र फोटो कायम ट्रे़डिंग असतात. आजकाल या दोन सेलिब्रेटींचे लहानपणीचे फोटोज खूपच व्हायरल होत असतात. दोघांचा बालपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. जो चाहत्यांना खूप आवडला आहे. 

कतरिना आणि विकीनं 1 वर्षांपुर्वी केले लग्न... 

विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी चाहते खूप उत्सुक होते. त्यांचे लग्नही अगदी थाटामाटात झाले होते. दीपिका पदुकोण, नताशा दलाल आणि मीरा राजपूत यांना मेंदी लावण्यासाठी प्रसिद्ध मेंदी कलाकार (Deepika Padukone Pathan) आले होते. मध्यंतरी कतरिनाच्या प्रेग्नंन्सीच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यांचे प्रत्येक लूक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांच्या लग्नातील जेवणाचा मेनू पुन्हा वाचून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. दोघांनीही त्यांच्या लग्नात राजस्थान, दक्षिण भारत, उत्तर भारत आणि अगदी इटालियन (Italian) जेवणाची व्यवस्था केली होती. लग्नात 120 लोकांच्या पाहुण्यांची यादी होती तसेच कॅटच्या लग्नात सलमान खान (Salman Khan in Katrina Kaif Wedding) उपस्थित राहण्याची सर्वांना प्रतीक्षा होती. दोघांच्या लग्नाच्या त्यावेळी खूप चर्चा रंगल्या.  

Read More