Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऋतिक रोशनसोबत काम करण्यास 'या' अभिनेत्रींचा नकार!

बॉलिवूडचा सुपरहिरो ऋतिक रोशन सध्या त्याच्या आगामी बायोपिक सिनेमा सुपर ३० मध्ये व्यस्त आहे. 

ऋतिक रोशनसोबत काम करण्यास 'या' अभिनेत्रींचा नकार!


मुंबई : बॉलिवूडचा सुपरहिरो ऋतिक रोशन सध्या त्याच्या आगामी बायोपिक सिनेमा सुपर ३० मध्ये व्यस्त आहे. ऋतिकने आपल्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत आणि साधारणपणे बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण बॉलिवूडच्या या ३ अभिनेत्रींनी त्याच्यासोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कोण आहेत या अभिनेत्री?

 बॉलिवूडची क्वीन

या यादीतील पहिले नाव आहे बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतचे. ऋतिक रोशन आणि कंगनाचा सिनेमा क्रिश ३ सध्या विवादात आहे. कंगनाने तिला धमकी दिल्याचे आरोप ऋतिकवर केले आहेत. तर ऋतिक यावर खुलेपणाने काही बोलत नाही. त्याचबरोबर अफेअरवरुन झालेल्या वादामुळे दोघे चांगलेच चर्चेत होते. त्यानंतर ऋतिकसोबत एकही सिनेमा न करण्याचे कंगणाने ठरवले आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल

प्रियंका चोप्रा हे या यादीतीत दुसरे नाव आहे. क्रिशमधून समोर आलेली ही जोडी सुपरहीट ठरली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही तगडी कमाई केली. त्यानंतर अग्नीपथ आणि क्रिश ३ मध्ये दोघांनी एकत्र काम केले. पण गेल्या पाच वर्षात दोघांनीही पुन्हा एकत्र काम केले नाही.

अर्जुन रामपालची पत्नी

या यादीतील शेवटचे नाव आहे अर्जुन रामपालची पत्नी मेहर जेसियाचे. मेहर एक फिल्म प्रोड्यूसर आहे. तिने अर्जुनसोबत आई सी यू या सिनेमाची निर्मिती केली होती. खरंतर ऋतिकसोबत काम न करण्याचे मेहरचे कारण आहे त्याची पत्नी सुजेन खान. अर्जुन कपूर आणि सुजेन खानच्या जवळीकच्या चर्चेमुळे मेहरने ऋतिक रोशनपासून दूर राहणे पसंत केले. 

 

Read More