Marathi News> मनोरंजन
Advertisement

....अन् मुलीचे शब्द ऐकून सुष्मिताला अश्रू अनावर

सुष्मिताच्या मुलीचे विचार ऐकून म्हणाल....   

....अन् मुलीचे शब्द ऐकून सुष्मिताला अश्रू अनावर

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन ही सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच तिच्या खासगी आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी प्रेक्षकांसमोर आणत असते. तिच्या दोन्ही मुली म्हणू नका किंवा मग प्रियकर रोमन शॉल म्हणू नका. प्रत्येक गोष्टीविषयी ती बऱ्याच गोष्टी पोस्ट करत असते. अशातच तिने एक नवा व्हिडिओ पोस्ट केला आहे, जे पाहता सुष्मिताच्या भावना अश्रूंवाटे का व्यक्त झाल्या याचा अंदाज लावता येत आहे. 

बॉलिवूड सौंदर्यवती, सुष्मिता हिला तिच्या मुलीचे शब्द भावूक करुन गेले आहेत. याला निमित्त ठरत आहे ते म्हणजे सुष्मिताच्या लहान मुलीने म्हणजेच अलिसाह हिने लिहिलेला एक निबंध. मुलं दत्तक घेण्याच्या एका मुद्यावर तिच्या लेकीने असा काही निबंध लिहिला ज्या माध्यमातून साऱ्या विश्वाकडे आणि या संवेदनशील मुद्द्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन सर्वांसमोर आला. 

मुलीचा निबंध वाचतानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये सुष्मिताने तिच्याच निबंधातील एक ओळ लिहिली आहे. 'तू असं एज जीवन बहाल केलं आहेस, जणू तू कोणा एकाचं आयुष्य वाचवलं आहेस', असं तिने लिहिलं. सुष्मिताने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिची लेक स्वत: लिहिलेला एक निबंध वाचून दाखवत आहे. ज्यामध्ये ती स्वत:च्या अनुभवांचंही कथन करत आहे. 

प्रत्येकालाच जगण्याचा अधिकार आहे, असं म्हणत ती प्रत्येकालाच मुलं दत्तक घेण्याचाही अधिकार आहे कारण प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात आनंदाची उधळणही हवी आहे ही ओळ वाचते. अलिसाहचे हे शब्द ऐकून सुष्मिताचा प्रियकर रोमन यानेही तिची प्रशंसा करत तिचं संगोपन करणाऱ्या आणि मातृत्व स्वीकरणाऱ्या सुष्मिताप्रतीही आदराची भावना व्यक्त केली आहे. 

Read More