Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : आकंठ प्रेमात बुडालेल्या सुष्मिताने पोस्ट केलेला 'हा' व्हिडिओ पाहिला?

रॉमन आणि सुष्मिता एकमेकांना काही महिन्यांपासून डेट करत आहेत. 

VIDEO : आकंठ प्रेमात बुडालेल्या सुष्मिताने पोस्ट केलेला 'हा' व्हिडिओ पाहिला?

मुंबई : काही कलाकार मंडळी ही कलाविश्वातील त्यांच्या योगदानासोबतच आणखी एका कारणामुळे ओळखले जातात. ते कारण म्हणजे त्या कलाकारांचं खासगी आयुष्य. बऱ्याच दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा चेहरा म्हणजे अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा. सुष्मिता प्रकाशझोतात आहे ते म्हणजे रॉमन शॉल याच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे. मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय असणारा रॉमन आणि सुष्मिता एकमेकांना काही महिन्यांपासून डेट करत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नात्याची कबुलीही फार आधीच दिली आहे. 

अनेकदा त्याच्यासोबतचा फोटो किंवा एखादा व्हिडिओ पोस्ट करत सुष्मिता नेहमीच तिच्या रिलेशनशिपची सुरेख बाजू सर्वांसमोर ठेवत जणू चाहत्यांना किंबहुना प्रेमात असणाऱ्या अनेकांनाच #CoupleGoals देत असते. आताही तिने असाच एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती रॉमनसोबत पाठमोरी उभी दिसत असून, आजूबाजूचा निसर्गही त्यांच्या प्रेमाच्याच रंगाच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत सुष्मिता तिच्या आयुष्यात आलेल्या या खास क्षणांना हळूवारपणे जपत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

'Tuned in & Zenned' असं कॅप्शन लिहित तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका वेगळ्याच जगात नेणाऱ्या संगीतामुळे तो व्हिडिओ अधिकच प्रत्ययकारीपणे समोर येत आहे. प्रत्येक वेळी आपल्या नात्याला अग्रस्थानी ठेवत तेच आपलं बलस्थान समजणारी सुष्मिता येत्या काळात रॉमनसोबतच्या नात्याला कोणत्या नव्या वळणावर नेणार याचीही उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 

मुलींना दत्तक घेत एकल मातृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय असो किंवा मग वयाने लहगान असणाऱ्या रॉमनसोबतचं नातं असो, सुष्मिताचं खासगी आयुष्य नेहमीच लक्षवेधी ठरलं आहे. बऱ्याच खासगी आयुष्याची एक बाजू ही सर्वांपासून दूर ठेवणारी हीच अभिनेत्री रॉमनसोबतच्या तिच्या नात्याविषयी मात्र सुरुवातीपासूनच अगदी खुलेपणाने व्यक्त झाली आणि प्रेमाच्या या प्रवासात खऱ्या अर्थाने एकरुप झाली आहे, असंच म्हणावं लागेल. 

Read More