Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान, शाहरुख आणि आमीरसोबत काम का करत नाहीस? श्रद्धा कपूरने दिलं उत्तर, म्हणाली 'मला चांगल्या...'

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या स्त्री 2 (Stree 2) चित्रपटामुळे चर्चेत आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.   

सलमान, शाहरुख आणि आमीरसोबत काम का करत नाहीस? श्रद्धा कपूरने दिलं उत्तर, म्हणाली 'मला चांगल्या...'

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या स्त्री 2 (Stree 2) चित्रपटामुळे चर्चेत आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. फक्त 50 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने फक्त 4 दिवसात 200 कोटींचा पल्ला गाठला आहे. यासह श्रद्धा कपूरच्या नावावर आणखी एका सुपरहिट चित्रपटाची नोंद झाली आहे. श्रद्धा कपूरने बॉलिवूडमधील आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण आजपर्यंत ती शाहरुख, सलमान आणि आमीर खानसह एकाही चित्रपटात झळकलेली नाही. 

श्रद्धा कपूरने आशिकी, रॉक ऑन, स्त्री, हसीन पारकर, तू झुठी मै मक्कार, ओके जानू, हाफ गर्लफ्रेंड, एक व्हिलन अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अर्जुन कपूर, फरहान अख्तर, प्रभास, राजकुमार राव अशा अभिनेत्यांसह तिने काम केलं आहे. पण या यादीत शाहरुख, सलमान, आमीर मात्र दिसत नाहीत. नुकतंच एका पॉडकास्टमध्ये तिला याबाबत विचारण्यात आलं असता तिने यामागील कारण सांगितलं. मला तशी संधी आजपर्यंत मिळाली नाही असं सांगताना तिने इतर कारणंही सांगितली. 

श्रद्धाने सांगितलं की, "मला आजपर्यंत त्यांच्यासह काम करण्याची अशी कोणती संधी मिळालेली नाही. जरी तुम्हाला असा एखादा चित्रपट ऑफर करण्यात आला आणि त्यात एखादा मोठा अभिनेता असेल तरी तुम्हाला तुमची भूमिका स्वत:साठी योग्य वाटणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला ती भूमिका आव्हानात्कम वाटत नसेल तर आपण हा चित्रपट करु नये असं आपल्याला वाटतं".

पुढे ती म्हणाली की, "जर मला अशी कोणतीही संधी मिळाली तर मी काम करण्यास तयार आहे, मग तो अभिनेता कोणीही असो. माझं स्पष्ट आहे की, मला चांगल्या दिग्दर्शकांसह काम करायचं आहे, चांगल्या चित्रपटांचा भाग व्हायचं आहे. मला चांगलं काम करायचं आहे. त्यात अभिनेता कोण आहे ही नंतरची गोष्ट आहे".

अशाच एका मुलाखतीत श्रद्धा कपूरने आपल्याला इंडस्ट्रीत कोणी काम देत नव्हतं असा दावा केला होता. दोन फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये कोणीही तिच्यासोबत काम करण्यास तयार नव्हतं, तेव्हा मोहित सुरीनं तिला संधी दिली असं तिने सांगितलं होतं. श्रद्धाने सांगितलं की, अनेक ऑडिशन्स द्यावे लागले कारण त्यावेळी कोणाला माझ्यासोबत काम करायची इच्छा नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमचे चित्रपट फ्लॉप झालेले असतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत पुढेही येतात आणि त्यामुळे तुम्हाला पुढे चित्रपट मिळणं कठीण असतं. मग मोहित सुरीला काय माहित काय वाटलं काय माहित आणि त्यानं विश्वास दाखवला. 

'स्त्री 2' हा चित्रपट 2018 मधील 'स्त्री' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. तर पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर 'स्त्री 2' मध्ये वरुण धवन आणि अक्षय कुमार यांचाही कॅमिओ आहे. 

Read More