Marathi News> मनोरंजन
Advertisement

'नो मेकअप लूक' शेअर करणाऱ्या समीराचा महत्त्वाचा संदेश

पाहा ती म्हणतेय तरी काय? 

'नो मेकअप लूक' शेअर करणाऱ्या समीराचा महत्त्वाचा संदेश

मुंबई : प्रेक्षकांची मनं जिंकत आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर अधिराज्य गाजवणाऱ्या ९० च्या दशकातील  काही अभिनेत्रींमध्ये समीरा रेड्डी हिचंही नाव घेतलं जातं. गेल्या बऱ्याच काळापासून समीरा रुपेरी पडद्यापासून दूर आहे. कलाविश्वापासून काहीसा दुरावा ठेवत समीराने तिच्या खासगी आयुष्याला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. पण, तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती कायमच सर्वांच्या संपर्कात राहिली. 

काही दिवसांपूर्वीच समीराने तिच्या दुसऱ्या गरोदरपणातील फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. 'अंडरवॉटर फॉटोशूट'मध्ये तिने आयुष्यातील या वळणाचा आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. त्यामामोगमागच आता तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती 'नो मेकअप लूक'मध्ये सर्वांसमोर आली आहे. 

'आपण जसे आहोत तसाच स्वत:चा स्वीकार करत मी तुमच्यासमोर आले', असल्याचं ती म्हणत आहे. 'मी स्वीकारार्हता निवडली आहे, सकारात्मकता निवडली आहे, मी स्वत:ला, स्वत:वर प्रेम करण्याच्या वृत्तीला निवडलं आहे', असं म्हणत स्वत:शी प्रामाणिक राहण्याचा सुरेख सल्ला ती या व्हिडिओतून देताना दिसत आहे. एक अभिनेत्री असल्यामुळे आव्हानं स्वीकारावी लागली असं म्हणत, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्याचं कौतुक करण्याला प्राधान्य द्या. काहीच लपवून ठेवण्याची गरज नाही. कारण, प्रत्येकजण, प्रत्येक शरीर मग ते कोणाचंही, कोणत्याही रंगाचं असो; ते सुंदरच आहे, असंही ती सांगत आहे.  

'बॉडी शेमिंग' आणि 'नो मेकअप' अशा दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिने या पोस्टच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी तिने अशाच आशयाची एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिने स्वत:च्या  आयुष्यातील काही प्रसंगाचा आधार घेत परिणामकारक उदाहरणं सर्वांसमोर ठेवली होती. सध्याच्या घडीला या बॉलिवूड अभिनेत्रीचा आत्मविश्वास आणि बऱ्याच गोष्टींकडे पाहण्याची तिची सकारात्मक वृत्ती इतरांवरही प्रभाव पाडत आहे. 

Read More