Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरबाजसोबत मलायकानं नेमकं काय ठरवलं, ज्यासाठी त्यांना पुन्हा एकत्र यावं लागतंय?

कारण वाचून हैराण व्हाल 

अरबाजसोबत मलायकानं नेमकं काय ठरवलं, ज्यासाठी त्यांना पुन्हा एकत्र यावं लागतंय?

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा हिनं काही वर्षांपूर्वीच पती अरबाज खान याच्यासोबतच्या वैवाहिक नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जवळपास 19 वर्षांच्या वैवाहित नात्यातून विभक्त होण्याचा या दोघांचाही निर्णय सर्वांनाच धक्का देऊन गेला. नातं तुटलं पण, तरीही अरबाज आणि मलायका मात्र एकत्र दिसण्याचं बंद झालं नाही. (Malaika arora )

सहसा आपण एखाद्या व्यक्तीपासून दूर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या समोर येणं प्रकर्षानं टाळलं जातं.

मुद्दा असा, की इथं त्या व्यक्तीसोबत आठवणींनाची टाळलं जाण्याला प्राधान्य देण्यात येतं. पण, मलायका आणि अरबाजच्या बाबतील मात्र असं घडलं नाही. कारण, काही वर्षांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयामुळं त्यांना काही प्रसंगी एकत्र यावंच लागलं. (Malaika arora arbaaz khan arhaan khan )

हा निर्णयही तितकाच महत्त्वाचा, कारण मलायका आणि अर्जुन या दोघांनीही हा निर्णय त्यांच्या मुलाच्या म्हणजेच अरहानच्या जन्माच्या वेळी घेतला होता. मलायकानं एका मुलाखतीमध्ये याबाबतचा उलगडा केला. 

... यामुळं तुझं करिअर संपेल; असं तिला मुलाच्या जन्मानंतर सांगण्यात आलं होतं. पण, मलायकानं मात्र तसं होऊ दिलं नाही. मुलाच्या जन्मानंतर लगेचच दुसऱ्या महिन्यामध्ये मलायकानं स्टेज शोमध्ये परफॉर्मन्स दिला. 

मुख्य म्हणजे शो वरून ती वेळेत मुलाला (अरहानला) झोपवण्यासाठी वेळेत घरी परतली होती. मुलाचं संगोपन करत असतानाच तिनं अरबाजच्या सोबतीनं लेकाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा ठरवलं होतं. 

किंबहुना आताही ते दोघं पती- पत्नीच्या नात्यातून वेगळे झाले असले तरीही अरहानसाठी मात्र ते एकाच वाटेवर अनेकदा येताना दिसतात. अरहानचा पहिल्यांना दाढी करण्याच्या वेळीसुद्धा अरबाजचीच मदत मलायकानं घेतली होती. 

आजच्या घडीला अरबाजसोबतचं मलायकाचं नातं बदललं असली तरीही एक आई म्हणून मात्र ती कायमच ही शर्यत जिंकली आणि आता तर, अरहानचीही खास मैत्रीण झाली. 

तुम्हाआम्हाला पाहताना मलायकाची श्रीमंती आणि तिचा रुबाब अनेकदा दिसतो. पण, जीवनाच्या प्रवासात तिचा संघर्ष नेमका किती होता हे मात्र ती स्वत:च जाणते. नाही का? 

Read More