Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमृतानं मलायकाला अशी टक्कर मारली, की ती झाली 'झंडू बाम'; पाहा व्हिडीओ

डान्स सुरु असतानाच पुढं जे काही घडलंय ते पाहून .....

अमृतानं मलायकाला अशी टक्कर मारली, की ती झाली 'झंडू बाम'; पाहा व्हिडीओ

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या फिटनेस आणि योगसाधनेसाठी ओळखली जाते. योगावर प्रभुत्व असणारी ही अभिनेत्री तितकीच चांगली डान्सरही आहे. खुद्द मलायकानंच सोशल मीडियावर अनेकदा याचा पुरावाही दिला आहे. यातच भर टाणारा आणखी एक व्हिडीओ नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. 

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये मलायका आणि तिची बहीण, अमृता डान्स करताना दिसत आहेत. #ShutUp या गाण्यावर ही सेलिब्रिटी बहिणींची जोडी नाचताना दिसत आहे. गाण्याचे बोल आणि त्यावर ठेका धरत, साजेसे हावभाव करत त्यांचा डान्स सुरु असतानाच पुढं जे काही घडलंय ते पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेनासं झालं आहे. 

डान्स वगैरेपर्यंत सर्वकाही ठीक, पण पुढे मात्र अमृता नाचता नाचचा मोठ्या उत्साहात मलायकाला असा काही धक्का देते की ती फ्रेमच्याच बाहेर फेकली जाते. 'Succumbed.. Hips don’t lie!', असं कॅप्शन देत मलायकानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

अरोरा सिस्टर्सचा हा अफलातून व्हिडीओ पाहून फॉलोअर्सनी त्यावर असंख्य कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच सेलिब्रिटी आणि फॉलोअर्सनी कमेंट बॉक्समध्ये या व्हिडीओवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. काहींना हा व्हिडीओ भावला, काहींना तो विनोदी वाटला, तर काहींनी मात्र त्यावर नाराजीचा सूर आळवला. 

Read More