Marathi News> मनोरंजन
Advertisement

विकीसोबत लग्न होऊनही कतरिना 'या' माणसाला देतेय जास्त वेळ; तो आहे तरी कोण?

कतरिनाच्या सर्वात जवळचा व्यक्ती आहे

विकीसोबत लग्न होऊनही कतरिना 'या' माणसाला देतेय जास्त वेळ; तो आहे तरी कोण?

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ सध्या कोरोनाचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या पार्टीला हजेरी लावली होती. असं म्हटलं जातंय, की इथूनच तिला कोरोनाचा संसर्ग झाला. गेल्या काही काळापासून कतरिना तिच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करताना दिसतेय. 

इतकंच नव्हे, तर ती तिच्या वैवाहिक जीवनालाही तितकंच महत्त्वं देताना दिसली. पती, अभिनेता विकी कौशल याच्यासोबत शक्य तितका वेळ व्यतीत करण्याला कतरिना हल्ली प्राधान्य देताना दिसते. (Bollywood Actress katrina kaif spends time with strange man than Vicky Kaushal )

तुम्ही आता म्हणाल, की विकीच कतरिनाच्या सर्वात जवळचा व्यक्ती आहे. पण, तसं नाहीये. कारण विकीपेक्षाही जास्त वेळ कतरिना कोणा दुसऱ्या व्यक्तीला देते. 

fallbacks

fallbacks

प्रत्येक क्षणी कतरिनाला साथ देणारा हा व्यक्ती म्हणजे दीपक सिंह. तो कतरिनाचा बॉडीगार्ड आहे. कतरिना जाईल, तिथे दीपक तिच्यासोबत दिसतो. त्याच्या पगारासाठी ती महिन्याला लाखो रुपये मोजते. 

गर्दीच्या ठिकाणी जेव्हा चाहत्यांची गर्दी कतरिनासोबत फोटो काढण्यासाठी, तिला शेकहँड करण्यासाठी येते तेव्हा दीपकच तिला या अडचणींपासून दूर नेताना दिसतो. अभिनेत्री सुरक्षिततेमध्ये दीपक कोणतीही हयगय होऊ देत नाही. 

fallbacks

fallbacks

बरं, दीपकविषयी सांगावं तर आजवर कॅटसोबतचे त्याचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दिसणारं त्याचं रुबाबदार रुप पाहता, भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्यांनाही तो टक्कर देतो, असं म्हणायला हरकत नाही. 

Read More