Marathi News> मनोरंजन
Advertisement

असा दिसतो करीनाचा लहान मुलगा; नावाचा वाद सुरु असतानाच Finally समोर आली पहिली झलक

जहांगीर तर अगदी करीनाच्या कुटुंबातील या व्यक्तीसारखा दिसतो.  

असा दिसतो करीनाचा लहान मुलगा; नावाचा वाद सुरु असतानाच Finally समोर आली पहिली झलक

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) खान हिनं काही महिन्यांपूर्वीच एका मुलाला जन्म दिला. तैमुरनंतर हे करीनाचं दुसरं बाळंतपण. सेलिब्रिटी कुटुंबात जन्मलेल्या या नवजात बालकाबाबत बरंच कुतूहल सुरुवातीपासून पाहायला मिळालं. त्यातही नेमका तो कसा दिसतो हा प्रश्न अनेकांनीच उपस्थित केला. करीनानंही अद्यापही तिच्या मुलाचा अधिकृत फोटो पोस्ट केला नव्हता. पण, आता मात्र या चिमुकल्या जहांगीरची पहिलीवहिली झलक सर्वांसमोर आली आहे.

एकिकडे करीनानं तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये जे म्हणजेच जहांगीरचा (Jahangir) एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तिची ब्रेकफास्टची प्लेट दिसत होती, आणि दुसरीकडे जे त्याच्या खेळण्यानं खेळताना दिसत होता. सोशल मीडियावर करीनाच्या या फोटोवर लक्ष जात असतानाच दुसरीकडे फिल्मफेअर आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवरुन जहांगीरचा फोटो पोस्ट करण्यात आला. 

करिना कपूरच्या बाळाच्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांना सबा अली खानकडून उत्तर

 

शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये जहांगीर (kareena kapoor son name) नेमका कसा आहे, तो घरातील कोणत्या व्यक्तीसारखा दिसतो हे कळत आहे. त्याचा संपूर्ण चेहरा या फोटोंमध्ये दिसत नसला तरीही त्याच्या चेहऱ्याची एक बाजू बऱ्यापैकी स्पष्ट दिसत आहे. जे पाहून तैमुर आणि त्याच्या लहान भावाच्या चेहऱ्यामध्ये बरंच साम्य असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. 

fallbacks
छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम 

करीना, करिष्मा आणि सैफ अली खान रणधीर कपूर यांच्या घराकडे जात असतानाच माध्यमांच्या प्रतिनिधींनी या सेलिब्रिटी कुटुंबाची झलक फोटोमध्ये टीपली. यावेळी करीनानंही मोठ्या उत्साहात कॅमेरामन्सकडे हात उंचावत त्यांचे आभार मानले. सेलिब्रिटी आणि माध्यमांमध्ये असणारं एक सुरेख नातं यावेळी दिसून आलं. 

Read More