Marathi News> मनोरंजन
Advertisement

पैसे मागणाऱ्या मुलीसोबत काजोलनं जे केलं ते पाहून तुम्ही काय म्हणाल? Video प्रचंड व्हायरल

नुकतीच काजोल मुंबईत एके ठिकाणी दिसली, त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांभोवती अनेकदा याचक पैसे मागण्यासाठी येतात, तशीच एक लहान मुलगी तिच्यापाशी आली आणि...   

पैसे मागणाऱ्या मुलीसोबत काजोलनं जे केलं ते पाहून तुम्ही काय म्हणाल? Video प्रचंड व्हायरल

Bollywood News : अभिनेत्री काजोल (Kajol) ही तिच्या अभिनयासोबतच आणखी एका कारणामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ते कारण म्हणजे तिचा मनमिळाऊ स्वभाव आणि संवेदनशील वृत्ती. काही माणसांच्या येण्यानंच सकारात्मकता जाणवते. काजोलही त्यापैकीच एक. अशी ही बॉलिवूड (Bollywood Actress) अभिनेत्री नुकतीच शहरातील एका ठिकाणी गेली होती. तिथे गेलं असता नेहमीप्रमाणे कॅमेराच्या नजरा तिच्याकडे वळल्या. या कॅमेरात जे क्षण टीपले तेच व्हायरल झाले (Viral Video) आणि नेटकरी पाहतच राहिले. (Bollywood Actress kajol Viral Video giving money to Small girl  )

अमुक एका ठिकाणाला भेट देऊन निघत असतानाच काजोलपुढे एक लहान मुलगी आली. तिने तिच्याकडे पैसे (Money) मागण्यास सुरुवात केली. आता या मुलीचं वय इतकं कमी, की तिला कोण काजोल, कुठली काजोल ठाऊक नाही. हो, पण ही व्यक्ती आपल्याला मदत करेल याच आशेनं ती तिच्यापाशी गेली आणि पैसे मागू लागली. 

अधिक वाचा : अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; सेलिब्रिटी कपल मोठ्या अडचणीत

 

काजोलनं मोठ्या प्रेमानं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि ती कारमध्ये बसली. इथवर व्हिडीओ पाहिल्यानंतर, अशी काय ही... पाच दहा रुपयांनी काय कमी होणार होतं? असाच प्रश्न नेटकीर विचारणार तोच पुढे दिसतं की, कारमध्ये बसल्यानंतर तिनं पर्स हातात घेतली आणि त्यातून काही पैसे काढले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

कारचा दरवाजा उघडून काजोलनं हे पैसे त्या मुलीच्या हातात दिले. आपल्याला मिळालेली ही मदत पाहून त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावरचा आनंदही पाहण्याजोगा होता. रस्त्यावर काजोलनं फार वेळ घालवला नाही. ती तडक कारच्या दिशेनं गेली. पण, आपल्यासमोर आलेल्या या मुलीला मदत करायला मात्र ती विसरली नाही. काजोलच्या मनाचा मोठेपणा पाहून अनेकांनाच आनंद झाला आणि पुन्हा एकदा ती अनेकांचीच आवडती अभिनेत्री आणि व्यक्तिमत्त्वं का आहे हे सिद्ध झालं. 

Read More