Marathi News> मनोरंजन
Advertisement

रात्रीच्या वेळी असं काय बिनसलं, की जान्हवी Rumoured बॉयफ्रेंडला सोडूनच निघाली...

कॅमेरात कैद... Video Viral 

रात्रीच्या वेळी असं काय बिनसलं, की जान्हवी Rumoured बॉयफ्रेंडला सोडूनच निघाली...

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर हिनं कायमच तिच्या मादक रुपानं चाहत्यांना घायाळ केलं आहे. फक्त घायाळ केलं नाही, तर चाहत्यांच्या मनात तिनं कायमस्वरुपी स्थान मिळवलं आहे. खास मित्रपरिवारासोबतच एखाद्या ठिकाणी सुट्टीसाठी जाणं असो, किंवा मग एखाद्या कार्यक्रमात येणं असो. जान्हवी येताच बाकीच्यांवरची नजर हटून तिच्यावरच रोखते. 

अशा या बॉलिवूड अभिनेत्रीनं नुकतंच मुंबईतील एका रेस्तराँमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ती तिथं कथित प्रियकर, Orhan Awatramani याच्यासोबत आली होती. हाय थाय स्लिट असणारा काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस तिनं यावेळी घातला होता. या लूकला तिनं पांढऱ्या स्निकर्सची जोड दिली होती. (Bollywood Actress Janhvi Kapoor parties with rumoured BF Orhan Awatramani watch video )

किमान मेकअपमध्ये यावेळी जान्हवीचं कमाल सौंदर्य सर्वांनाच पाहायला मिळालं. एरव्ही जान्हवी माध्यमांसमोर येताच तिच्या चेहऱ्यावर छान स्मितहास्य पाहायला मिळतं. पण, Orhan Awatramani सोबतच्या या खास क्षणांदरम्यान काहीतरी बिनसलं आणि ती तातडीनं कारमध्ये बसून निघून गेली. 

जान्हवी निघताच ओरहानही तिच्या मागोमाग आला आणि लगेचच त्याला माध्यमांच्या कॅमेरांनी टिपलं. रात्रीच्या वेळी इतक्या उशिरा बी- टाऊनच्या या बहुचर्चित जोडीमध्ये आता नेमकं काय बिनसलं, हाच प्रश्न चाहत्यांनी उपस्थित करण्यात सुरुवात केली आहे. 

दरम्यान, ओरहान आणि जान्हवी काही दिवसांपूर्वी उटीला सुट्टीसाठी गेले होते. त्यादरम्यानचे त्यांचे बरेच फोटो चाहत्यांनी पाहिले होते. तेव्हापासूनच त्यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता. 

Read More