Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्याच्या पत्नीचा Hot स्विमिंग लूक पाहून भल्याभल्या अभिनेत्रींना विसराल

वयाच्या चाळीशीच्या टप्प्यावर असतानाच एक अफलातून फोटो पोस्ट केला.   

अभिनेत्याच्या पत्नीचा Hot स्विमिंग लूक पाहून भल्याभल्या अभिनेत्रींना विसराल

मुंबई : हिंदी चित्रपट जगतामध्ये काही कुटुंब अशी असतात ज्यातील प्रत्येक सदस्यावर चाहत्यांच्या नजरा असतात. असंच एक कुटुंब आहे कपूर. याच कुटुंबातील एका सुनेनं वयाच्या चाळीशीच्या टप्प्यावर असतानाच एक अफलातून फोटो पोस्ट केला. 

फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या लूकची बरीच चर्चा झाली. स्विमिंग पूलमध्ये पाठमोरी असणारी ही कपूर कुटुंबाची सून आहे तरी कोण, असाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? 

तर, ही आहे अभिनेता संजय कपूर याची पत्नी, माहीप कपूर. माहीप एरव्हीसुद्धा सोशल मीडियावर बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. पण, तिनं दुबईतील स्विमिंग पूलमधून शेअर केलेला फोटो भल्याभल्या अभिनेत्रींनाही मागे टाकेल असाच आहे. 

बिकीनी लूकला तिनं ज्या आत्मविश्वासानं कॅरी केलं आहे हे पाहता, खरंच तिची दाद द्यावी तितकी कमी. आतापर्यंत तिच बरेच लूक सर्वांनी पाहिले. पण, माहिपचा हा बिकीनी लूक पाहता तिनं बोल्डनेसची हद्दच ओलांडली अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे. 

दोन मुलांची आई असणारी माहीप ज्या पद्धतीनं कलाजगतामध्ये वावरते ते पाहता या दोन्ही मुलांनाही आपल्या आईचा गर्व असावा असं म्हणायला हरकत नाही. 

Read More