Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाहा भाचा- पुतण्यांसोबत सलमानची धमाल

भाईजान सलमानच सरस... 

पाहा भाचा- पुतण्यांसोबत सलमानची धमाल

मुंबई : 'भारत' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता सलमान खान सध्याचा वेळ त्याच्या कुटुंबासोबत व्यतीत करत आहे. मुख्य म्हणजे आगामी चित्रपटांच्या कामांचं वेळापत्रक निश्चित असतानाही सलमान मात्र #Me_Time अनुभवत आहे. मग ते मित्रमंडळींसोबत धमाल करणं असो किंवा पुतण्यांसोबतची धमाल असो. 

सोशल मीडियावर सलमानने केलेल्या काही पोस्ट पाहता लगेचच याचा अंदाज लावताय येत आहे. ज्यामध्ये सलमान त्याच्या पुतण्यांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. इतकच नव्हे, तर तो त्यांच्यासोबत एक खेळ खेळताना दिसत आहे. ज्यामध्ये हातावर मारला जाणारा फटका चुकवायचा असतो.

 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान या खेळात त्याच्या पुतण्यांवर चांगलाच वर्चस्व प्रस्थापित करताना दिसत आहे. तर, त्याच्या घरातील ही ज्युनियर मंडळीसुद्धा या क्षणाचा पुरेपूर आनंद घेतना दिसत आहेत. रविवारचा सुट्टीचा दिवस पाहता सलमानच्या घरात बरीच मंडळीही दिसत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणेच हे एक प्रकारचं 'गेट टूगेदर' असावं असं म्हणायला हरकत नाही. 

 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

भाचे आणि पुतण्यांसोबतची सलमानची ही मजा- मस्ती पाहता बच्चेकंपनीसोबत असणारं त्याचं नातं सर्वांसमोर येत आहे. अरहान हा अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री- मॉडेल मलायका अरोरा यांचा मुलगा आहे. (अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाला आहे.) तर, निर्वाण हा सोहेल आणि सीमा खान यांचा मुलगा आहे. अयान हा सलमानचा भाचा असून, तो अल्विरा आणि अतुल अग्नहोत्री यांचा मुलगा आहे. खान, कुटुंबाचा हा फॅमजॅम पाहता अनेकांनाच सलमानचा हेवा वाटत आहे. 

Read More