Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ranbir Alia Fight: बाळाच्या जन्माआधीच रणबीर- आलियाच्या नात्यात वादाची ठिणगी

ते म्हणतात ना सगळं चांगलं असलं की गालबोट लागेल असं काहीतरी घडतंच. 

Ranbir Alia Fight: बाळाच्या जन्माआधीच रणबीर- आलियाच्या नात्यात वादाची ठिणगी

Ranbir Kapoor Alia Bhatt Fight: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही जोडी विविहाबंधनात अडकण्याआधीपासूनच चर्चेत होती. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अशा दोन्ही बाबतीत रणबीर आणि आलियानं प्रेक्षकांची मनं जिंकली. मैत्री, प्रेम आणि मग लग्न असा प्रवास या जोडीनं केला. आतातर ते बाळाच्या स्वागतासाठीही सज्ज झाले आहेत. पण, ते म्हणतात ना सगळं चांगलं असलं की गालबोट लागेल असं काहीतरी घडतंच. या जोडीच्या बाबतीतही हेच घडताना दिसत आहे. 

(Alia bhatt) आलियाशी आपला वाद होत असल्याचं खुद्द रणबीरनंच एका मुलाखतीत म्हटलं आणि त्यानं चाहत्यांच्या नजरा वळवल्या. एकिकडे येणाऱ्या बाळासाठी आपण पूर्णपणे तयार आहोत असं म्हणत असतानाच दुसरीकडे मात्र Ranlia चा हा वाद सर्वांसमोर आला आहे. (Bollywood Actor Ranbir kapoor Alia bhatts Fight before childs birth)

वादाचं कारण काय? 
रणबीरनं सांगितल्यानुसार त्यानं बाळासाठी संपूर्ण तयारी केली आहे. तर, आलियानंही आपली चेकलिस्ट तयार असल्याचं म्हटलं आहे. पण, यादरम्यान एका पुस्तकामुळं त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. 

अधिक वाचा : Ranbir Alia Wedding : रणबीरनं जेव्हा आलियाला थेट जेजुरी स्टाईल उचलून घेतलं

याविषयी सांगताना रणबीर म्हणाला, 'एका पुस्तकामुळे आमच्यात वाद होत आहे. आलियानं ते पुस्तक वाचलंय आणि मीसुद्धा ते वाचावं अशी तिची इच्छा आहे. मी ते पुस्तक फक्त 30 टक्केच वाचू शकलो आणि तिला म्हटलं की पुस्तकं आपल्याला मुलांना मोठं कसं करायचं ते शिकवणार नाहीये. हे जेव्हा प्रत्यक्षात घडेल तेव्हाच आपण याचा अनुभव घेऊ शकू'. या मुद्द्यावरून आपल्या या नात्यात बराच वाद झाल्याचं त्यानं सांगितलं. 

Read More