Marathi News> मनोरंजन
Advertisement

पोटगीच्या मागणीसह नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

त्यांच्या नात्यात गेल्या काही वर्षांपासून... 

पोटगीच्या मागणीसह नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

मुंबई : एकिकडे कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊनची चर्चा असतानाच दुसरीकडे एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या वैवाहिक नात्यातही असंच तणावाचं वातावरण आल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यांमुळं काहीसा अडचणींचा सामना करताना दिसत आहे. 

कारण, नवाजच्या पत्नीने म्हणजेच आलियाने सिद्दीकी हिने त्याच्यापासून घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला आहे. शिवाय तिच्याकडून नवाजला रितसर नोटीसही पाठवण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर आलियाकडून त्याच्याकडे पोटगीचीही मागणी करण्यात आली आहे. 

ऐका आणि पाहा : 'त्या वुहानमध्ये कोणीतरी वटवाघूळ खायलाय....'; संकर्षण कऱ्हाडे म्हणतोय कोरोनाची कविता 

'झी न्यूज'शी संवाद साधताना तिनं याविषयीची माहिती दिली. आपल्या वैवाहिक आयुष्यात तणाव असून तो गंभीर स्वरुपाचा तणाव आहे, असं म्हणत पुढे अशाच परिस्थितीत हे नातं टीकवणं कठीण असल्याची माहिती तिनं दिली. तणावाचं मुळ कारण मात्र तिनं स्पष्ट केलं नाही. 

 

नवाज आणि त्याची पत्नी यांचं जवळपास १० वर्षांचं वैवाहित नातं धोक्यात आल्यामुळे ही बाब अनेकांनाच धक्का देणारी ठरत आहे. मागील काही वर्षांपासून नवाज आणि त्याच्या भावामुळं आपल्या वैवाहिक नात्यात तणावाची परिस्थिती उदभवल्याचा सूर तिने आळवला होता. काही काळ आपल्या निर्णयाचा पुनर्विचार केल्यानंतर अखेर तिनं घटस्फोटासाठीचं पाऊल उचललं आहे. नवाजला आठवडाभरापूर्वीच घटस्फोटाची नोटीस पाठवण्यात आली. याबाबत च्याचं उत्तर प्रतिक्षेत आहे. 

 

Read More